India vs New Zealand 1st Test : भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या पूर्वसंख्येला पत्रकार परिषद घेऊन या मालिकेसाठी सज्ज असल्याची गर्जना केली, परंतु त्याचवेळी टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याचे वृत्त समोर येत आहे. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill ) हा उद्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे.
शुभमन गिल हा भारताच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे आणि त्याने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मजबूत केले आहे. गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत ११९ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ३९ धावा केल्या होत्या. भारताने ही कसोटी दोन दिवसाच्या आत जिंकली होती. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या लढतीत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मान आणि खांदा दुखत असल्याची तक्रार शुभमनने केली आहे. शुभमनने याबाबत संघ व्यवस्थापनाला कल्पना दिली आहे आणि पहिल्या कसोटीत त्याच्या खेळण्याबाबत उद्या सकाळी निर्णय घेतला जाईल.
शुभमनच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजीसाठी लोकेश राहुल हा पर्याय भारताकडे आहे. त्यामुळे मधल्या फळीत सर्फराज खान किंवा ध्रुव जुरेल यांना संधी मिळू शकते. शिवाय भारताकडे अक्षर पटेल हा अतिरिक्त अष्टपैलू खेळवण्याचा पर्यायही आहेच. बंगळुरू येथे मुसळधार पाऊस पडल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितले आणि त्यामुळे उद्याची खेळपट्टी व हवामान पाहून प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेतला जाईल, हे रोहितने स्पष्ट केले.
भारत - रोहित शर्मा ( कर्णधार), जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन, मार्क चॅम्पमन, विल यंग, डॅरील मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचीन रवींद्र, टॉम ब्लंडल, अजाझ पटेल, बेन सिर्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, विलियम ओ'रौर्क
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.