India vs Oman ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup : भारतीय संघ इमर्जिंग आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेतील सलग दोन सामने जिंकून तिसरा सामना ओमानविरूद्ध खेळत आहे. ओमनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली, पण भारत अ संघाने ओमनचा डाव १४० धावांवर गुंडाळला. या सामन्यात भारतातील ८ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यापैकी ५ खेळाडूंना प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आले.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या जतिंदर सिंग आणि अमिर कलीमने सामन्याची सुरूवात सुंदर केली. परंतु दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अमिर कलीमला (१३) आकिब खानने माघारी पाठवले. त्यामागोमाग निशांत सिंधूच्या गोलंदाजीवर कर्णधार जतिंदर सिंग(१७) बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या करन सोनावलेला रमनदीप सिंगने १ धावेवर परतावले व ओमानला ३३ धावांवर तिसरा धक्का मिळाला.
वसीम अली व मोहम्मद नदीम यांनी संथ खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. पण, १५ व्या षटकात वसीम अलीला(२४) बाद करून साई किशोरने त्यांची भागीदारी मोडली. त्यानंतर मोहम्मद नदीम व हमद मिर्झाने ५४ धावांची भागीदारी केली. २०व्या षटकात मोहम्मद नदीम ४१ धावांवर बाद झाला व ओमानचा डाव १४० धावांवर संपुष्टात आला.
या सामन्यामध्ये आठ भारतीय खेळाडूंनी फलंदाजी केली. ज्यामध्ये अकिब खान, रसिख सलाम, निशांत सिंधू, रमनदीप सिंग व साई किशोर यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.
तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, अनुज रावत (यष्टीरक्षक), नेहल वधेरा, आयुष बडोनी, साई किशोर, रसिख सलाम, निशांत सिंधू, , रमनदीप सिंग, राहुल चाहर, अकिब खान.
जतिंदर सिंग (कर्णधार), अमिर कलीम, करन सोनावले, वसीम अली, मोहम्मद नदीम, हमद मिर्झा (यष्टीरक्षक), संदीप गौड, जय ओडेद्रा, सुफियान महमुद, समय श्रिवास्तव, मुझाहीर रझा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.