IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup : भारताने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ८ विकेट्स गमावत १८३ धावा केल्या व १८४ धावांचे आव्हान पाकिस्तानसमोर ठेवले आहे.
tilak varma
tilak varmaesakal
Updated on

India vs Pakistan ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup: ओमानमध्ये आज ट्वेंटी-२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना रंगला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि रणनीतीप्रमाणेच सुरूवातीपासून भारताने आक्रमक पवित्रा घेतला. भारताने ८ विकेट्स गमावत १८३ धावा केल्या व १८४ धावांचे आव्हान पाकिस्तानसमोर ठेवले आहे.

भारतीय सालामीजोडी अभिषेक शर्मा व प्रभ सिमरन सिंगने स्पोटक फलंदाजीने डावाची सुरूवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा(३५) झेलबाद झाला. त्यामागोमाग अराफत मिन्हासच्या गोलंदाजीवर प्रभ सिमरन सिंग(३६) देखील परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या तिलक वर्माने नेहल वढेराला साथीला घेत फटकेबाजी सुरूच ठेवली. परंतु वधेरा (२५) धावांवर बाद झाला, तर आयुष बदोनी (२) फार चांगली कामगिरी करू शकला नाही.

१९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कर्णधार तिलक वर्मा (४४) बाद झाला आणि भारताच्या खेळीला ब्रेक लागला. भारताने शेवटच्या २ षटकात ४ विकेट्स गमावले आणि २० षटकांच्या समाप्तीनंतर भारताने १८३ धावा धावफळकावर लावल्या. पाकिस्तानला १८२ धावांचे आव्हान दिले आहे.

या डावात पाकिस्तानने ६ गोलंदाज वापरले. त्यापैकी ५ खेळाडूंना विकेट घेण्यात यश आले. ज्यामध्ये अब्बास आफ्रिदीला विकेट मिळला नाही. सुफियान मोकीमला २ विकेट्स घेण्यात यश आले. तर इतर गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.

tilak varma
IND vs PAK : भारत पाकिस्तान आज पुन्हा भिडणार; कुठे पाहता येणार live मुकाबला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.