IND vs PAK : भारत पाकिस्तान आज पुन्हा भिडणार; कुठे पाहता येणार live मुकाबला

Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024: ट्वेंटी-२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेमध्ये आज भारत पाकिस्तान आमने-सामने येणार.
asia cup 2024
asia cup 2024esakal
Updated on

IND A vs PAK A : ओमानमध्ये ट्वेंटी-२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली. आज तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारत 'अ' संघ पाकिस्तान 'अ' संघाशी भिडणार आहे. भारत व पाकिस्तान दोन्ही संघाचा स्पर्धेतील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध असणार आहे. हा सामना ओमानमधील अल अमिरत मैदानावर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता हा सामना होणार आहे.

सामना कुठे पाहता येईल ?

भारत विरुद्ध पाकिस्तान ट्वेंटी-२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेतील सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पहायला मिळेल व मोबाईलवर Disney + Hotstar वर पाहू शकता.

asia cup 2024
T20 Emerging Teams Asia Cup: तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाकिस्तानला भिडणार! जाणून घ्या भारताचं वेळापत्रक

भारतीय अ संघाचं वेळापत्रक

१९ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (वेळ - संध्या. ७ वा.)

२१ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध युएई (वेळ - संध्या. ७ वा.)

२३ ऑक्टोबर - भारत अ विरुद्ध ओमान (वेळ - संध्या. ७ वा.)

उपांत्य आणि अंतिम सामना

२५ ऑक्टोबर - पहिला उपांत्य सामना - (वेळ - दु. २.३० वा.)

२५ ऑक्टोबर - दुसरा उपांत्य सामना - (वेळ - संध्या. ७ वा.)

२७ ऑक्टोबर - अंतिम सामना (वेळ - संध्या. ७ वा.)

asia cup 2024
तिलक वर्मा टीम इंडियाचा कर्णधार! Emerging Teams Asia Cup साठी झाली भारतीय संघाची घोषणा; पाकिस्तानविरुद्ध पहिलाच सामना

भारतीय अ संघ -

तिलक वर्मा (कर्णधार), अनुज रावत, आकिब खान, अभिषेक शर्मा, प्रभ सिमरन सिंग, वैभव अरोरा, आयुष बडोनी, नेहल वढेरा, रसिख सलाम, निशांत सिंधू, अंशुल कंभोज, साई किशोर, रमनदीप सिंग, हृतिक शोकीन,राहुल चाहर

पाकिस्तान अ संघ -

मोहम्मद हारिस (कर्णधार), अब्दुल समद, अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हैदर अली, हसिबुल्ला, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मेहरान मुमताज, मोहम्मद इम्रान जूनियर, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, शाहनवाज दहनी, जमान खान, यासिर खान आणि सुफियान मोकीम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.