India vs Pakistan T20 WC Ticket : जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत टी 20 वर्ल्डकप होणार आहे. भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना हा या वर्ल्डकपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना असेल. हा सामना 9 जूनला न्यू यॉर्कमध्ये होणार आहे. या शहराच्या आसपास भारत आणि पाकिस्तान मधून येत अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे.
त्यामुळे हा सामना प्रत्यक्ष पाहायला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असणार आहे. आयसीसी टी 20 वर्ल्डकपची हवा अमेरिका आणि वेस्ट इंडीजने चांगलीच तयार करण्यास सुरूवात केली आहे. भारत- पाकिस्तान या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना असणार आहे.
या सामन्याचे अधिकृत तिकीट हे 6 डॉलरपासून सुरू होणार आहे. याची भारतीय चलनातील किंमत ही 497 रूपेय इतकी आहे. मात्र हे तिकीट रिसेल मार्केटमध्ये अत्यंत चढ्या भावाने विकले जात आहे.
भारत - पाकिस्तान आणि भारत - कॅनडा यांच्यातील सामन्यांच्या तिकीटाला सोन्याचा भाव आला आहे. अधिकृतरित्या या तिकीटांची विक्री काही क्षणातच संपली होती. मात्र आता ही तिकीटे रिसेल मार्केटमध्ये आली असून त्याच्या किंमती या गगनाला भिडल्या आहेत. या तिकीटांच्या किंमती या मूळ किंमतीपेक्षा दुप्पटीने वाढल्या आहेत.
भारत - पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे व्हीआयपी तिकीट हे आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर 400 डॉलरला होते. याची भारतीय चलनातील किंमत ही 33 हजार रूपये इतकी होते. मात्र रिसेल प्लॅपफॉर्मवर हेच तिकीट 40 हजार डॉलर म्हणजे तब्बल 33 लाखांवर पोहचले आहे. यात जर प्लॅटफॉर्म फी जोडली तर त्याची किंमत 50 हजार डॉलर (41 लाख रूपये) इतकी जाते. भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट एनबीएच्या फायनलमधील तिकीटाएवढेच झाले आहे.
भारत - पाकिस्तान सामन्याचे सर्वात स्वत तिकीट हे रिसेल मार्केटमध्ये जवळपास 1259 डॉलरपर्यंत पोहचले आहे. म्हणजे या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट हे भारतीय चलनात 1.04 लाखाला मिळणार आहे. सीट गीक या प्लॅटफॉर्मवर हे तिकीट थोडं स्वस्त म्हणजे 96 हजारापर्यंत मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.