IND vs SA पहिला सामना रद्द होण्याची शक्यता? समोर आले हे कारण...

IND vs SA T-20 Series: भारतविरूद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेला उद्यापासून (८ नोव्हेंबर) सुरूवात होणार असून पहिला रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
India vs South Africa
India vs South Africaesakal
Updated on

IND vs SA T-20 Match Weather Report : भारतविरूद्ध दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० मालिकेला उद्यापासून (८ नोव्हेंबर) सुरूवात होणार आहे. चार सामन्यांची ही मालिका असून पहिला सामना किंग्समेड डर्बन येथे खेळवण्यात येणार आहे. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत ३-० असा विजय मिळवला. तर उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चार सामन्यांमध्ये भारतीय संघ समोरा जाणार आहे. पण, आफ्रिकेतील हवामान खात्याने उद्याच्या सामन्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार सामन्याच्या ठिकाणी उद्या दिवसभर पाऊस पडण्याची ५०% शक्यता आहे. तर संध्याकाळी ७ नंतर ४७% पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदाज खरे ठरल्यास उद्याच्या पहिल्या सामन्यात पाऊस पडून पावसामुळे सामना रद्द होवू शकतो.

India vs South Africa
IND vs SA : टीम इंडिया T20I साठी दक्षिण आफ्रिकेत दाखल; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, तारीख, संघ अन् थेट प्रक्षेपण

दक्षिण आफ्रिकेचा अलीकडील ट्वेंटी-२० मध्ये फॉर्म फारसा चांगला राहिला नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला वेस्ट इंडिजने ३-० ने व्हाईटवॉश केले. त्यानंतर आर्यलॅंडविरूद्धचया मालिकेत १-१ ने च्या बरोबरीत समाधान मानावे लागले.

टी२० मालिकेचे वेळापत्रक (दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत)

  • ८ नोव्हेंबर - पहिला टी२० सामना, डर्बन (वेळ - रा. ८.३० वाजता)

  • १० नोव्हेंबर - दुसरा टी२० सामना, गकेबेहरा (वेळ - रा. ७.३० वाजता)

  • १३ नोव्हेंबर - तिसरा टी२० सामना, सेंच्युरियन (वेळ - रा. ८.३० वाजता)

  • १५ नोव्हेंबर - चौथा टी२० सामना, जोहान्सबर्ग (वेळ - रा. ८.३० वाजता)

India vs South Africa
IND vs SA T20I : सूर्यकुमार यादवच्या टीमला टक्कर देण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज; दोन तगडे हिटर संघात परतले

भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान, यश दयाल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ :

एडन मार्करम (कर्णधार), ओटनेल बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरा, रिझा हेंड्रीक्स, मार्को यानसेन, हेनरिच क्लासेन, पॅट्रीक क्रूगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, एनकाबा पीटर, रियान रिकेल्टन, एंडिले सिमेलन, लुथो सिपाम्ला, त्रिस्तान स्तब्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.