Sanju Samson hundred: यष्टिरक्षक- फलंदाज संजू सॅमसनने डर्बनचे मैदान गाजवले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील डर्बन येथे झालेल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात संजूच्याच नावाचा दबदबा राहिला. त्याने ५० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांची आतषबाजी करताना १०७ धावांची वादळी खेळी केली.
या शतकासह संजूने भारताच्या क्रिकेट इतिहासात असा विक्रम नोंदवला, जो विराट कोहली, रोहित शर्माच काय तर एकाही भारतीयाला आतापर्यंत नोंदवता आलेला नाही. जगात फक्त चार फलंदाजांना असा पराक्रम करता आला आहे आणि त्यात संजू हा एकमेव भारतीय आहे.