India Women Team
India Women TeamSakal

INDW vs SAW: तब्बल 10 वर्षांनी भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीत भिडणार! कधी अन् कुठे पाहाणार सामने; जाणून घ्या डिटेल्स

India Women vs South Africa Women: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात एकमेव कसोटी सामना चेन्नईत रंगणार आहेत, या सामन्याचा तपशील जाणून घ्या.
Published on

India Women vs South Africa Women Test: दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका नुकतीय बंगळुरूला पार पडली असून या मालिकेत भारतीय महिला संघाने 3-0 अशा फरकाने दक्षिण आफ्रिका महिला संघाला पराभूत केले.

या वनडे मालिकेनंतर आता दोन्ही संघ चेन्नईला आले असून येथे एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या महिला संघात 28 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

दरम्यान, चेन्नईत तब्बल 48 वर्षांनंतर महिला संघाचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर 1976 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघात कसोटी सामना येथे झाला होता, जो अनिर्णित राहिला होता.

तसेच भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यापूर्वी कसोटीमध्ये दोनवेळाच आमने-सामने आले होते. 2002 मध्ये पार्लला झालेल्या सामन्यात भारताने 10 विकेट्सने विजय मिळवलेला, तर 2014 साली झालेल्या सामन्यात म्हैसुरला झालेल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 34 धावांनी विजय मिळवला होता.

India Women Team
INDW vs RSAW : शेवटच्या षटकात पूजा वस्त्रकारचा चमत्कार; भारताचा 4 धावांनी विजय अन् मालिका खिशात

या 5 खेळाडूंना पदार्पणाची संधी

दरम्यान, भारतीय संघात निवड झालेल्या उमा छेत्री, प्रिया पुनिया, साईका इशाक, अरुंधती रेड्डी आणि शबनम शकील या 5 खेळाडूंना कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये यातील कोणाला संधी मिळणार, हे पाहावे लागणार आहे.

भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील कसोटी सामन्याचा तपशील

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील कसोटी सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर 28 जून ते 2 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील कसोटी सामना किती वाजता सुरु होणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील कसोटी सामन्यातील प्रत्येक दिवसाचा खेळ सकाळी 9.30 वाजता चालू होणार आहे.

India Women Team
INDW vs SAW: भारतीय संघात 17 वर्षीय गोलंदाजाची एन्ट्री; तिन्ही फॉरमॅटमध्ये BCCI कडून मिळाली संधी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर आणि ऑनलाईन कसे पाहाता येईल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील कसोटी सामन्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाचे हक्क स्पोर्ट्स18 कडे आहेत. त्यामुळे स्पोर्ट्स18 च्या चॅनेलवर हे सामने पाहाता येतील. तसेच जिओ सिनेमा वेबसाईट किंवा ऍपवरही या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

दोन्ही संघ -

  • भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया, शबनम शाकिल

  • दक्षिण आफ्रिका संघ - लॉरा वोल्वार्ड्ट (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लार्क, ॲनेरी डेर्कसेन, मिके डी रिडर, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, मसाबता क्लास, सुन लुस, एलिझ-मारी मार्झ, नॉनकुलुलेको एमलाबा, तुमी सेखुकुन, नॉन्डुमिसो शांगासे, डेल्मी टकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.