India Women vs South Africa Women: दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर असून तिन्ही प्रकारच्या मालिका खेळणार आहे. रविवारपासून दक्षिण आफ्रिका आणि भारतीय महिला संघात वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. त्यासाठी दोन्ही संघही सज्ज आहेत.
या तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व लॉरा वोल्वार्ड करणार आहे. दरम्यान, वनडे मालिकेत तीन सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका 23 जून रोजी संपेल.
वनडे मालिकेतील तिन्ही सामने बंगळुरूला खेळवले जाणार आहेत. या वनडे मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ चेन्नईला जाणार असून तिथे एकमेव कसोटी सामना आणि 3 सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारे वनडे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता चालू होणार आहेत. तसेच 28 जून ते 1 जुलै दरम्यान होणारा कसोटी सामन्यांतील प्रत्येक दिवसाचा खेळ सकाळी 9.30 वाजता चालू होईल. तसेच 5 ते 9 जुलै दरम्यान होणाऱ्या टी20 मालिकेतील तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहेत.
दक्षिण आफ्रिका महिला संघाच्या भारत दौऱ्यातील सामन्यांच्या लाईव्ह प्रक्षेपणाचे हक्क स्पोर्ट्स18 कडे आहेत. त्यामुळे स्पोर्ट्स18 च्या चॅनेलवर हे सामने पाहाता येतील. तसेच जिओ सिनेमा ऍपवरही या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
वनडे मालिका - बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता) -
16 जून - पहिला वनडे सामना
19 जून - दुसरा वनडे सामना
23 जून - तिसरा वनडे सामना
कसोटी सामना -
28 जून ते 1 जुलै - एकमेव कसोटी सामना, चेन्नई (वेळ - स. 9.30 वाजता)
टी20 मालिका चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता) -
5 जुलै - पहिला टी20 सामना
7 जुलै - दुसरा टी20 सामना
9 जुलै - तिसरा टी20 सामना
वनडे मालिकेसाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स *, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दयालन हेमलथा, राधा यादव, आशा शोभना, श्रेयंका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्रकार*, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया
कसोटी सामन्यासाठी संघ - - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमाह रॉड्रिग्स *, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर *, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया
टी२० मालिकेसाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स *, सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव, अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्राकर*, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी
वनडे मालिकेसाठी संघ - लॉरा वोल्वार्ड्ट (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लार्क, ॲनेरी डेर्कसेन, मिके डी रिडर, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, सुन लुस, एलिझ-मारी मार्झ, नॉनकुलुलेको एमलाबा, तुमी सेखुकुन, नॉन्डुमिसो शांगासे, डेल्मी टकर
कसोटी सामन्यासाठी संघ - लॉरा वोल्वार्ड्ट (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लार्क, ॲनेरी डेर्कसेन, मिके डी रिडर, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, मसाबता क्लास, सुन लुस, एलिझ-मारी मार्झ, नॉनकुलुलेको एमलाबा, तुमी सेखुकुन, नॉन्डुमिसो शांगासे, डेल्मी टकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.