IND vs SL 1st T20I : ब्रेकिंग! भारताचा प्रमुख खेळाडू सराव सत्रात जखमी, पहिल्या सामन्यात खेळण्यावर शंका

IND vs SL 1st T20I Big Blow : ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होण्यास दोन दिवस शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सराव करताना प्रमुख खेळाडू जखमी झाला आहे.
Mohammed Siraj gets injured
Mohammed Siraj gets injuredsakal
Updated on

Big Blow for Team India before match against Sri Lanka - भारत-श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला २७ जुलैपासून सुरूवात होत आहे. पण, त्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारतीय संघाचे सराव सत्र गुरुवारी पार पडले आणि यात प्रमुख खेळाडूला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) मार्गदर्शनाखालील पहिल्याच दौऱ्याला सुरूवात होण्यापूर्वीच टीम इंडियाची चिंता वाढली आहे.

भारतीय संघ २२ जुलैला कोलंबोत दाखल झाला आणि सरावालाही सुरूवात केली. गुरुवारी झालेल्या सराव सत्रात सारे सुरळीत सुरू असल्याचे दिसत असताना माशी शिंकली. भारताच्या ट्वेंटी-२० संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याच्या पायाला चेंडू लागला आणि त्याला त्वरित उपचार घ्यावे लागले. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी वाटत आहे.

Mohammed Siraj gets injured
IND vs SL Special Jersey: भारतीय संघाचे वाढले 'Star'! नवी जर्सी पाहून वाटेल अभिमान Video

सिराजच्या गैरहजेरीत दोन पर्याय..

मोहम्मद सिराज पहिल्या सामन्यात न खेळल्यास भारताकडे अर्शदीप सिंग व खलिल अहमद हे दोन नियमित जलदगती गोलंदाजांचे पर्याय आहेत. शिवाय संघात हार्दिक पांड्या व शिवम दुबे हे जलदगती गोलंदाज अष्टपैलू खेळाडू संघात असल्याने टीम इंडियाला फार चिंता करण्याचं कारण नाही.

Mohammed Siraj gets injured
Mohammed Siraj gets injuredsakal

श्रीलंकेला दोन धक्के...

भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत यजमान श्रीलंकेला दोन धक्के बसले आहेत. या मालिकेतून माघार घेणारा नुवान तुषारा हा श्रीलंकेचा दुसरा जलदगती गोलंदाज ठरला. बुधवारी दुश्मंथा चमिराने आजारपणामुळे माघार घेतली आणि त्याच्याजागी असिथा फर्नांडोची निवड केली गेली. नुवानच्या रिप्लेसमेंटची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी डावखुरा गोलंदाज दिलशान मदुशंका याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Mohammed Siraj gets injured
IND vs SL : गौतम गंभीरला ट्वेंटी-२० संघात Mumbai Indians चा 'हा' खेळाडू हवा होता, पण...

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.