IND vs SL 3rd T20I 2024 Kandy Weather : भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेवर कब्जा केला आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (30 जुलै) पल्लेकेले येथे खेळला जाणार आहे. मात्र, कँडीमध्ये काल सोमवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही खराब हवामानाची शक्यता आहे. सोमवारी सूर्यकुमार यादवने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये मुसळधार पाऊस दिसत आहे.
सूर्यकुमार यादव शेअर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये कँडीमध्ये तुफान पाऊस दिसत आहे, पण सुर्या मात्र टेन्शनमध्ये दिसत नाही, कारण संघाने आधीच मालिका जिंकली आहे आणि आता शेवटच्या सामन्याच्या निकालाचा मालिकेवर परिणाम होणार नाही.
व्हिडिओ शेअर करताना सूर्यकुमारने लिहिले की, "शानदार वातावरणात!" भारताने शनिवारी 43 धावांनी आणि रविवारी सात विकेट्सने विजय मिळवून श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.
पावसामुळे सामना पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. 30 जुलै रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात पावसाची 23% शक्यता आहे. सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असण्याचीही 97% शक्यता आहे. तापमान 22 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
भारत आणि श्रीलंका यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 31 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 21 विजयांसह हेड टू हेड रेकॉर्डमध्ये आघाडी कायम राखली आहे, तर श्रीलंकेने यापैकी नऊ सामने जिंकले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.