IND vs SL : स्वॅग! गौतम गंभीर युगाची सुरुवात; पाहा टीम इंडियाचा मुंबई टू श्रीलंका प्रवास, Video

India vs Sri Lanka Series : गौतम गंभीरचा टीम इंडियासोबतचा मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे.
gautam gambhir and team reach sri lanka
gautam gambhir and team reach sri lankasakal
Updated on

India tour Sri Lanka : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केली. राहुल द्रविड यांच्या यशस्वी कारकीर्दिनंतर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir Head Coach) खांद्यावर आली. आता खऱ्या अर्थाने गौतम गंभीर युगाची सुरूवात झालेली पाहायला मिळतेय. सूर्यकुमार यादव हा ट्वेंटी-२०चा नवा कर्णधार बनला, तर शुभमन गिलकडे वन डे व ट्वेंटी-२० संघाचे उप कर्णधारपद सोपवून भविष्याचेही संकेत दिले गेले.

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया पहिल्या दौऱ्यासाठी काल श्रीलंकेत दाखल झाला. २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीर व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. याचवेळी द्रविडने जे यश मिळवलं आहे, तशीच कामगिरी करण्याचा निर्धार गौतमने व्यक्त केला आणि हे सोपं नक्कीच नसेल हेही त्याने मान्य केले.

gautam gambhir and team reach sri lanka
३ फॉरमॅट, ३ संघ? जसप्रीतचे कौतुक अन् सपोर्ट स्टाफची घोषणा; Gautam Gambhir ची स्पष्ट भूमिका

वर्ल्ड कप विजेता खेळाडू गौतम गंभीरसमोर २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०२७ चा वन डे वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही आव्हानं आहेत. त्याची सुरुवात श्रीलंका दौऱ्यावरून होणार आहे आणि गंभीर युगाची सुरुवात कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

gautam gambhir and team reach sri lanka
Gautam Gambhir Press Conference: रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळतील का? गौतमचं 'गंभीर' विधान

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.