BCCI ने कान टोचल्यावर इशान किशन भानावर आला; टीम इंडियात पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू, कर्णधारपदही मिळालं

Ishan Kishan will lead Jharkhand: इशान किशन मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार असून त्याच्याकडे आता झारखंड संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही देण्यात आली आहे.
Ishan Kishan
Ishan KishanSakal
Updated on

Buchi Babu Trophy: भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक बुची बाबू ट्रॉफी ही स्पर्धा १५ ऑगस्टपासून तामिळनाडूमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव, इशान किशन असे काही मोठे स्टारही खेळताना दिसणार आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार इशान किशनकडे झारखंडचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. इशान यापूर्वी झारखंड संघाचा भाग नव्हता, पण तो आता बुधवारी संघाशी जोडला जाणार आहे.

याबाबत झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले, 'इशानच्याबाबत कधीही त्याच्या क्षमतेवर शंका नव्हती, फक्त तो पुनरागमनासाठी सज्ज आहे की नाही, याची खात्री नव्हती. निर्णय त्याचा होता.'

'त्याच्याकडून काही सांगण्यात आलं नव्हतं म्हणून आधी त्याचा आम्ही संघात समावेश केला नव्हता. पण जेव्हा त्याने सांगितलं की त्याला संघात पुनरागमन करायचं आहे, तेव्हा त्याला सामील करण्यात आलं.'

Ishan Kishan
Ishan Kishan : इशान किशनचं डोकं भानावर आलं; BCCI च्या आक्रमक भूमिकेनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com