Cricket Retirement: भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा, न्यूझीलंडविरुद्ध खेळलेला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना

Wriddhiman Saha announces retirement from cricket: भारताकडून ४० कसोटी सामने खेळणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Wriddhiman Saha - Rishabh Pant
Wriddhiman Saha - Rishabh PantSakal
Updated on

Wriddhiman Saha retirement : भारतात सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचा २०२४-२५ हंगाम सध्या सुरू आहे. याचदरम्यान आता भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

त्याने स्पष्ट केले आहे की चालू रणजी हंगाम त्याची अखेरची स्पर्धा असेल. साहा बंगालसाठी रणजी ट्रॉफी खेळत आहे. साहाने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या निवृत्तीची माहिती दिली.

त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, 'क्रिकेटच्या प्रवासाचा आनंद घेतला असून आता चालू हंगाम माझ्या कारकिर्दीतील अखेरचा असेल. बंगालचे अखेरच्यावेळी प्रतिनिधित्व करणे सन्मानजनक आहे. मी निवृत्त होण्यापूर्वी शेवटचे रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या प्रवासाचा भाग झालेल्या सर्वांचे आभार, तुमचा पाठिंबा खूप मोलाचा होता. हा हंगाम आता अविस्मरणीय बनवूया.'

Wriddhiman Saha - Rishabh Pant
Cricket Retirement: ऑस्ट्रेलियाच्या T20 वर्ल्ड कप विजेत्या धाकड खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; पाकिस्तानलाही फोडलेला घाम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()