Women's T20 World Cup 2024: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला गुरुवारी (३ ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे ही स्पर्धा होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाची मोहिम शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सुरू होणार आहे.
भारताचा पहिलाच सामना दुबईमध्ये न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होत आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना एक गोड भेट मिळाली.
खेळाडूंच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्याच्या व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आला. बीसीसीआयने याचा व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये दिसते की भारतीय संघातील खेळाडू एका रुममध्ये बसले आहेत. त्यांना आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
स्मृती मानधना, श्रेयंका पाटील, शफाली वर्मा, सजना सजीवन, हरमनप्रीत, रेणुका ठाकूर, पुजा वस्त्राकर, दिप्ती शर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, अशा अनेक खेळाडूंच्या कुटुंबियांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघ साखळी फेरीसाठी अ गटात आला. भारताला न्यूझीलंडनंतर ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे.
त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा सामना श्रीलंका विरुद्ध होणार आहे, तर १३ ऑक्टोबर रोजी अखेरचा साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. त्यानंतर जर भारताने अ गटातून गुणतालिकेत पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळवलं, तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळेल.
भारतीय संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष ( यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया ( यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन
राखीव खेळाडू - उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.