INDW vs SLW : मानलं, Shafali Verma! भारतासाठी ‘करो वा मरो’ सामन्यात विश्वविक्रमाची नोंद अन् स्मृतीसोबत सॉलिड सुरूवात

Women’s T20I World Cup 2024 : भारतासाठी करो वा मरो लढतीत शफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी श्रीलंका संघाच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आहे. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा पाया मजबूत केला आहे.
Shafali Verma
Shafali Vermaesakal
Updated on

Women’s T20I World Cup 2024 INDW vs SLW Marathi Updates: Shafali Verma ने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर प्रहार करताना भारतीय संघाला सकारात्मक सुरूवात करून दिली आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये शफालीने ताकद दाखवल्यानंतर स्मृती मानधनानेही हात मोकळे केले. शफालीने आजच्या महत्त्वाच्या लढतीत विश्वविक्रमाची नोंद केली.

१ विजय व १ पराभव खात्यात असलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती मोठ्या फरकाने काही करून जिंकायच्या आहेत. हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आशियाई विजेत्या श्रीलंकेच्या महिला संघाचे भारतासमोर आव्हान आहे. शफाली वर्माने आक्रमक सुरुवात केली, तर स्मृती मानधना थोडं सावरून खेळताना दिसली. शफालीने २४ धावा करताच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २००० धावांचा टप्पा ओलांडणारी ती पाचवी भारतीय महिला फलंदाज ठरली. स्मृती ( ३५१८), हरमनप्रीत कौर ( ३४७०), मितारी राज ( २३६४) व जेमीमा रॉड्रिग्ज ( २११०) या शफालीच्या पुढे आहेत.

शफाली वर्माने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त २००० धावा पूर्ण करणारी सर्वात युवा खेळाडू

  • भारतीय महिला संघाकडून ट्वेंटी-२०त २००० धावा करणारी ती पाचवी खेळाडू

  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त वेगाने २००० धावा ( ८३ इनिंग्ज) करणारी खेळाडू

  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वात कमी चेंडूंचा ( १५४५) सामना करून २००० धावा पूर्ण करणारी एलिसा हिलीनंतर दुसरी वेगवान खेळाडू  

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शफालीने २० वर्ष व २५५ दिवसांची असातना २००० धावा पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. ती सर्वात युवा खेळाडू ठरली. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या गॅबी लुईस ( २३ वर्ष व ३५ दिवस), भारताची जेमिमा रॉड्रिग्ज ( २३ वर्ष व ३१८ दिवस) आणि वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर ( २४ वर्ष व २७९ दिवस) यांच्या नावावर होता.  

शफाली ( ३२) व स्मृती ( ३८) यांनी भारताला ९ षटकांत बिनबाद ७० धावांपर्यंत पोहोचवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.