Gujarat flood Radha Yadav rescued by NDRF: मुसळधार पावसामुळे गुजरातच्या काही भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकं त्यात अडकली आहेत आणि त्यापैकी एक भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकीपटू राधा यादव आहे. गुजरात मधील वडोदरा पारिसरात राधा यादव पूरग्रस्त परिस्थितीत अडकली होती,परंतु NDRF ने तिला वाचवले.
राधा यादवने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये NDRF अधिकारी रस्त्यावर भरपूर पाणी असताना बोटीच्या मदतीने काही लोकांना वाचवत आहेत. “आम्ही खूप वाईट परिस्थितीत अडकलो होतो,परंतु NDRF च्या टीम ने आमची सुटका केली. NDRFचे आभार," असं तिने लिहिले आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक शहरांत पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. वडोदरा येथे परिस्थिती खूपच वाईट होती. तिथे पावसाने आता थोडी विश्रांती घेतली असली तरी, विश्वामित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूर आला.
वडोदरा शहरातील घरांमध्ये आणि छतावर अडकलेल्या अनेक लोकांना NDRF, राज्य समकक्ष SDRF आणि लष्कराच्या तीन तुकड्यांनी वाचवले. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्याला केंद्राकडून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये तीन दिवसांत २६ जणांचा बळी गेला आहे, तर बुधवारी सलग चौथ्या दिवशी मुसळधार सरी कोसळल्याने सुमारे १७८०० लोकांना पूरग्रस्त भागातून हलवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राधा यादव ही भारतीय महिला क्रिकेटपट्टू असून ती भारतासाठी फिरकी गोलंदाज म्हणून खेळते. तिने १३ फेब्रुवारी २०१८ रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने आत्तापर्यंत एकदिवसीय (ODI) क्रिकेट मध्ये ४ सामन्यांमध्ये ४ तर ट्वेंटी-२० मध्ये ७७ सामन्यांमध्ये ८० विकेट घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.