India vs South Africa Womens: भारतीय संघाने त्यांच्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला सराव सामना भारताने २० धावांनी जिंकला, तर आता दक्षिण आफ्रिका महिला संघावर भारताने २८ धावांनी विजय मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला पहिले दोन झटके देण्यात आफ्रिकेला लवकर यश आले. शफाली वर्मा शून्यावर माघारी गेली आणि कर्णधार हरमनप्रीतही १० धावांवर बाद झाली.
जेमिमा रॉड्रिग्जने स्मृती मानधनाबरोबर भागिदारी करण्याचा प्रयत्न केला. मागच्या सराव सामन्यातील अर्धशतक झळकावलेल्या जेमिमाने मानधनासोबत ४० धावांची भागीदारी केली. जेमिमा ३० धावांचे योगदान देऊन माघारी परतली. जेमिमानंतर ऋचा घोषने आक्रमक पवित्रा घेतला. तिला दीप्ती शर्माने साथ दिली आणि त्यांनी अवघ्या ५० चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. ऋचाने २५ चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकार लगावत ३६ धावा केल्या. दीप्ती ३५ धावांवर नाबाद राहिली. दक्षिण आफ्रिकेच्या अयाबोंगा खाकाने अंतिम षटकात तीन बळी घेतले. त्यामुळे भारताचा डाव १५० च्या पुढे जाऊ शकला नाही.
प्रत्युत्तरासाठी आलेल्या सलामीवीर लॉरा वोल्वार्ड आणि तझमिन ब्रिट्स पॉवरप्लेपर्यंत शांतपणे खेळी करत ३७ धावांची भागीदारी केली. परंतु पॉवरप्लेनंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात तझमिन ब्रिट्स आपली विकेट गमावून बसली. सुरूवातीला शांत आणि सावध पवित्रा घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्लेनंतर झटपट विकेट गमावण्यास सुरुवात केली.
पुढे क्लोई ट्रायॉन(२४) व ॲनेरी डेर्कसेन(२१) हिने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकापर्यंत ११६ धावा करता आल्या.
हरमनप्रीत कौर आणि शफाली वर्मा यांसारख्या फलंदाजांनी प्रत्येकी एक षटक टाकून भारताने स्पर्धेत ९ गोलंदाजी पर्याय वापरून पाहिले आणि त्यांनी विकेट्स देखील घेतल्या. आशा शोभनाने संघाला गरज असताना तीन षटकात दोन महत्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हा सामना २८ धावांनी गमवावा लागला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.