IND vs ZIM, 3rd T20I: भारताचा झिम्बाब्वेविरुद्ध सोपा विजय, मालिकेतही आघाडी; मेयर्सची अर्धशतकी झुंज अपयशी

India vs Zimbabwe, 3rd T20I: भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात सोपा विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली.
Team India
Team IndiaSakal
Updated on

India vs Zimbabwe, 3rd T20I: भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्ध हरारेला झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात २३ धावांनी सोपा विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या.

झिम्बाब्वेची सुरुवातच खराब झाली होती. त्यांनी अवघ्या ३९ धावांत ५ विकेट्स गमावल्या होत्या. यात कर्णधार सिकंदर रझाच्या विकेटचाही समावेश आहे. मात्र त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील डियॉन मेयर्सला यष्टीरक्षक फलंदाज क्लाईव्ह मदांडेची साथ मिळाली. त्यांनी ७७ धावांची भागीदारी करत झिम्बाब्वेच्या आशा पल्लवित केल्या होत्या.

Team India
Shubman Gill ने 7 वर्षांपूर्वीचा कोहलीचा 'विराट' विक्रम मोडला! सुरेश रैनानंतर दुसरा भारी कर्णधार ठरला

मात्र अखेर १७ व्या षटकात मदांडेला वॉशिंग्टन सुंदरने ३७ धावांवर बाद केले. यानंतर मात्र झिम्बाब्वेला विजय मिळवणं कठीण गेलं.

दरम्यान, मेयर्सने अर्धशतक करत चांगली झुंज दिली. त्याने ४९ चेंडूत ६५ धावांची खेळी केली, ज्यात ७ चौकार आणि १ षटकार मारला. तसेच वेलिंग्टन मसकादझा १८ धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ४ षटकात १५ धावाच खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. तसेच आवेश खानने ४ षटकात ३९ धावा खर्च करताना २ विकेट्स घेतल्या, तर खलील अहमदने १ विकेट घेतली.

Team India
IND vs ZIM: कर्णधार शुभमन गिलचं खणखणीत अर्धशतक; ऋतुराजची फटकेबाजी; भारताचं झिम्बाब्वेसमोर 183 धावांचं लक्ष्य

तत्पुर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी सलामीला आक्रमक फलंदाजी केली होती. त्यांनी ६७ धावांची भागीदारी केली. पण जयस्वाल ३६ धावांवर बाद झाला. अभिषेक शर्माही १० धावांवर स्वस्तात बाद झाला.

मात्र, गिलने आपली लय कायम ठेवली आणि ऋतुराज गायकवाडबरोबर ७२ धावांची भागीदारी केली. गिलने या दरम्यान अर्धशतकी खेळी करताना ४९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६६ धावा केल्या. तसेच ऋतुराजने २८ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. त्यामुळे भारताने २० षटकात ४ बाद १८२ धावा केल्या होत्या.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com