ICC Men's Test Rankings Rohit Sharma: रोहित शर्मा, विराट कोहली व यशस्वी जैस्वाल या भारताच्या तीन फलंदाजांनी आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत प्रत्येकी १ स्थान वर झेप घेतली आहे. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या टॉप १० मध्ये भारताचे तीन खेळाडू आहेत. नुकतीच श्रीलंका-इंग्लंड कसोटी मालिका पार पडली आणि यात लंकन खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या सहा खेळाडूंनी कारकीर्दितील सर्वोत्तम रेटिंग मिळवले आहेत.
श्रीलंकेने मागील कसोटी सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजयाची नोंद केली. कर्णधार धनंजया सिल्वा, मधल्या फळीतील फलंदाज कमिंदू मेंडिस आणि सलामीवीर पथूम निसंका यांनी फलंदाजीत कमाल करून दाखवली. श्रीलंकेच्या पहिल्या डावात सिल्वाने ६९ धावा केल्या होत्या. तो त्याच्या कारकीर्दितील सर्वोत्तम १३व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मेंडिसस आणि निसंका यांनी फलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे सहा व ३ स्थानांची झेप घेतली आहे.
इंग्लंडचा जो रूटने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. तिसऱ्या कसोटीत त्याला १३ व १२ धावा करता आल्या आणि त्याचे रेटिंग गुण ९२२ वरून ८९९ वर घसरले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला ( ८५९) अव्वल स्थानाकडे कूच करण्याची संधी मिळाली आहे. न्यूझीलंडचा डॅरील मिचेल ( ७६८) व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( ७५७) हेही शर्यतीत आहेत. रोहित शर्मा ( ७५१), यशस्वी जैस्वाल ( ७४०) व विराट कोहली ( ७३७) हे भारतीय फलंदाज अनुक्रमे पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहेत.