Indian Blind Cricket : पाकिस्तान मदत करते मग BCCI का नाही? अंध क्रिकेट संघाला हवा टीम इंडिया सारखा करार

भारताच्या अंध क्रिकेट संघाला प्रगतिपथावर आरूढ होण्यासाठी बीसीसीआयच्या मदतीची, मान्यतेची गरज आहे...
Indian Blind Cricket Team News Marathi
Indian Blind Cricket Team News Marathi sakal
Updated on

Indian Blind Cricket Team : भारताच्या अंध क्रिकेट संघाला प्रगतिपथावर आरूढ होण्यासाठी बीसीसीआयच्या मदतीची, मान्यतेची गरज आहे, असे मत या संघाचे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद इब्राहिम यांनी मंगळवारी व्यक्त केले आहे.

मोहम्मद इब्राहिम पुढे सांगतात की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून तेथील अंध क्रिकेट संघाला साह्य करण्यात येते. त्यांना करारबद्ध करण्यात येते. अंध क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देण्यात येते. तसेच पाकिस्तानचा अंध संघ संपूर्ण वर्षभर क्रिकेट खेळत असतो. आमच्यासाठी मात्र नागेश करंडकाच्या रूपात एकमात्र स्थानिक स्पर्धा आयोजित केली जाते.

Indian Blind Cricket Team News Marathi
Ind vs Eng 5th Test : पाचव्या कसोटीत 3 फिरकीपटू की 3 वेगवान गोलंदाज? जाणून घ्या कशी असेल टीम इंडियाची Playing-11

बीसीसीआयकडून मुख्य पुरुष व महिला संघांतील खेळाडूंना करारबद्ध करण्यात येते. त्यांच्यासाठी श्रेणी तयार करण्यात येते. श्रेणीनुसार खेळाडूंना मानधन देण्यात येते. बीसीसीआयने अंध क्रिकेटपटूंसाठीही याची सुरुवात करायला हवी. त्यानंतर अंध क्रिकेटपटूंचा संघ पुढे चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकतो, असा विश्‍वास मोहम्मद इब्राहिम यांनी व्यक्त केला.

Indian Blind Cricket Team News Marathi
Ranji Trophy : रणजी ट्रॉफी राहणार महाराष्ट्रातच! विदर्भच्या पोट्ट्यांनी मध्य प्रदेशला पाचव्या दिवशी पाजले पाणी, गाठली फायनल

सुगीचे दिवस

सध्या अंध क्रिकेटपटूंसाठी सुगीचे दिवस आले आहेत, अशी भावना भारतीय अंध क्रिकेट संघटनेचे सरचिटणीस शैलेंद्र यादव यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, अंध संघाचे माजी कर्णधार शेखर नाईक यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजय रेड्डी यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्र तसेच विविध राज्य सरकारकडून अंध क्रिकेटपटूंना आर्थिक मदत करण्यात येत आहे. हरियाना, केरळ व ओडिशा सरकारकडून नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. सरकारकडून आणखी काही खेळाडूंना नोकऱ्या मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Indian Blind Cricket Team News Marathi
WPL 2024 MIW : मुंबई इंडियन्सच्या इस्माईलने रचला इतिहास; टाकला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

या देशांमध्ये मान्यता

भारतामध्ये अद्याप बीसीसीआयकडून अंध क्रिकेट संघाला मान्यता देण्यात आलेली नाही; पण ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड व झिम्बाब्वे या देशांमधील राष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून अंध क्रिकेट संघटनेला मान्यता देण्यात आली आहे. आगामी काळात बीसीसीआयकडून अंध क्रिकेट संघटनेला मान्यता देण्यात आल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.