T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! कर्णधार हरमनप्रीतने म्हणाली, 'आशिया कपमधील पराभवानंतर...'

Indian T-20 Women's Team: टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ युएईमध्ये रवाना झाला आहे.
harmanpreet kaur
harmanpreet kauresakal
Updated on

T-20 World Cup Captain Harmanpreet Kaur : आशिया करंडक स्पर्धेतील एकमेव सामना आम्ही खराब खेळलो आणि विजेतेपद हुकले होते, परंतु त्यातून आमच्या उणिवा समजून आल्या. त्यावर आता मात करून आम्ही विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज झालो आहोत, असा विश्वास कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केला.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून महिलांची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू होत आहे. त्यासाठी आज बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत हरमनप्रीत कौर, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि निवड समितीच्या अध्यक्षा नीतू डेव्हिड उपस्थित होते.

श्रीलंकेत झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत आम्ही उत्तम खेळ केला होता, फक्त अंतिम सामन्यात आम्ही अपेक्षा पूर्ण करू शकलो नव्हतो, परंतु त्यातून आम्ही कोठे कमी पडत आहोत त्या उणिवा समजल्या आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, असे हरमनप्रीत कौर म्हणाली.

harmanpreet kaur
Rishabh Pant चा ऑस्ट्रेलियाने घेतला धसका; कसोटी मालिकेत रोखण्यासाठी आखणार नवी रणनीती

अमोल मुझुमदार यांनीही हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना सांगितले की, या टी-२० स्पर्धेच्या तयारीसाठी झालेल्या सराव शिबिरामध्ये आम्ही या उणिवांवर मार्ग शोधले आहेत. बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील शिबिरामध्ये आम्ही तंदुरुस्ती आणि क्षेत्ररक्षणावरही भर दिला. त्यानंतर आम्ही सराव सामने खेळलो. त्यामुळे सर्वंकष तयारी आम्ही केली आहे.

गुणवत्ता आणि क्षमतेच्या बाबतीत आपले खेळाडू कमी नाहीत, मात्र मोक्याच्या क्षणी मानसिकता अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही सराव शिबिरात क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ मुग्धा बर्वे यांची नियुक्ती केली. विश्वकरंडक स्पर्धेत आता कोणतीही कमी राहू नये म्हणून आम्ही सर्वतो प्रयत्न करत आहोत, असे मुझुमदार यांनी सांगितले.

harmanpreet kaur
IND vs AUS: भारताच्या सामन्यांची ऑस्ट्रेलियातही क्रेझ; मेलबर्नमधील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या तिकीटांची तिप्पट विक्री

मुग्धा बर्वे यांनी खेळाडूंशी वैयक्तिक आणि एकत्रित संघाबरोबर चर्चा केली. आता याचा फायदा आम्ही वैयक्तिक आणि संघ म्हणूनही होऊ शकेल. काही सत्रांमध्ये आमचा असा अभ्यास झालेला आहे, असे हरमनप्रीत म्हणाली.

पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ही टी-२० विश्वकरंडक स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती आणि आम्ही त्यादृष्टीने अगोदर तयारी केली होती, परंतु बांगलादेशमधील परिस्थितीमुळे स्पर्धा अमिराती येथे हलवण्यात आली. आशिया खंडातच स्पर्धा होत असल्यामुळे तसा मोठा फरक पडणार नाही, असे सांगून अमोल मुझुमदार म्हणाले, अमिरातीमध्ये सध्या उष्ण वातावरण असेल. आम्हाला दुबईत तीन आणि शारजामध्ये एक साखळी सामना खेळायचा आहे. तेथे गेल्यावर हवामान आणि खेळपट्ट्यांनुसार संघ रचना तयार करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.