Rohit Sharma : त्याला खेळू द्या, नंतर बोलू या ,रोहित शर्मा ; फॉर्मात असलेल्या यशस्वी जयस्वालबाबत भारतीय कर्णधाराचा सावध पवित्रा

यशस्वी जयस्वाल सध्या झकास फॉर्मात आहे... भारतीय संघासाठी ती अत्यंत चांगली बाब आहे... खूप काही बोलले जात आहे त्याच्याबद्दल, त्याच्या जीवन कहाणीबद्दल...
Rohit Sharma
Rohit Sharmasakal
Updated on

राजकोट : यशस्वी जयस्वाल सध्या झकास फॉर्मात आहे... भारतीय संघासाठी ती अत्यंत चांगली बाब आहे... खूप काही बोलले जात आहे त्याच्याबद्दल, त्याच्या जीवन कहाणीबद्दल... मी अजून काय बोलू... त्याला असेच मस्त खेळू द्या... नंतर आपण बोलू या, रोहित शर्माने खास त्याच्या मिश्कील शैलीत पत्रकार परिषदेत विचार मांडले.

मुंबई मैदानांच्या तंबूत एकटा राहून आणि पाणीपुरीच्या गाडीवर मदतनिसाचे काम करून क्रिकेटचे वेड जपलेल्या जयस्वालच्या यशाची कहाणी सध्या गाजत आहे. यावर बोलताना रोहित म्हणाला, यशानंतर माध्यमे गोडवे गातात आणि जरा अपयश आले की टीकेचा भडिमार करतात, हीच गोष्ट मला पटत नाही. तुम्ही कोणा खेळाडूला लगेच डोक्यावर घेऊ नका आणि थोड्या अपयशानंतर पाठीत धपाटे घालू नका. देशासाठी खेळताना खेळाडूला सतत यश मिळवणे शक्य होत नाही. म्हणून मी यशस्वी बद्दल जास्त बोलणार नाही. त्याला मनमोकळेपणाने खेळू द्या, आता तेच भारतीय संघाच्या फायद्याचे आहे, असे रोहित म्हणाला.

राजस्थान रॉयल्स संघाकडून एकत्र खेळत असलेल्या जोस बटलरने यशस्वी जयस्वालबद्दल इंग्लिश खेळाडू आणि काही पत्रकारांना अगोदरच धोक्याची सूचना दिली होती. लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यांत दोन द्विशतके ठोकलेल्या यशस्वी जयस्वालबद्दल इंग्लंडमधील वर्तमानपत्रांत बरेच काही चांगले लिहून येत आहे. जयस्वाल धावांचा किती भुकेला आहे हेच त्याच्या खेळातून दिसून आले आहे.

Rohit Sharma
Jasprit Bumrah : चौथ्या कसोटीत बुमराला विश्रांती? ; रांचीतील या सामन्यात केएल राहुल खेळण्याची शक्यता

सामन्यानंतर बोलताना रोहितने विजय इतका लवकर हाती येईल असे वाटले नव्हते. आमच्या गोलंदाजांना १३० षटके बाद करायला द्यायला पुरेशी असल्याचे वाटल्यावर मी डाव घोषित केला. विजय नक्की मिळेल, पण चांगली आक्रमक फलंदाजी करणाऱ्‍या इंग्लंड संघाला बाद करायला कष्ट घ्यावे लागतील, मात्र आपल्या गोलंदाजांनी फारच कमालीचा मारा केला. तसेच जयस्वाल-सर्फराझ भागीदारीने त्यांच्या मनोधैर्याला धक्का लागला होता. राजकोट सामन्यात तिसऱ्‍या दिवशी आपल्या गोलंदाजांनी ज्या तडफेने संघाला सामन्यात परत आणले ते लक्षणीय होते. गेल्या दोन कसोटी सामन्यांतील विजय म्हणूनच मनाला भावले आहेत, असे रोहित म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.