Ajinkya Rahane: इंग्लंडमध्ये 'अजिंक्य' कामगिरी; टीम इंडिया नव्हे तर या संघाकडून उतरणार मैदानात

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे जुलै-ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
Ajinkya Rahane
Ajinkya RahaneSakal
Updated on

Ajinkya Rahane News: भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे साधारण गेल्या वर्षभरापासून भारतीय संघातून बाहेर आहे. तो काही दिवसांपूर्वीच आयपीएलमध्येही खेळला होता. आता भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा आगामी हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे.

अशात आता अजिंक्य रहाणे जुलै-ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्याने लीसेस्टरशायर या काऊंटी क्लबशी करार केला आहे. तो या संघाची सध्या चालू असलेल्या काऊंटी चॅम्पियनशीप स्पर्धेदरम्यानच जोडला जाणार आहे.

त्यामुळे तो या संघाकडून काऊंटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील उर्वरित ५ सामने खेळले आणि नंतर लीसेस्टरशायरकडूनच वन डे कप ही स्पर्धाही खेळणार आहे. या स्पर्धेचे लीसेस्टरशायर गतविजेते आहेत.

Ajinkya Rahane
T20 World Cup 2024: भारत-इंग्लंड संघात काट्याची टक्कर; आत्तापर्यंत कोण ठरलंय टी20 मध्ये वरचढ?

36 वर्षीय रहाणे विआन मुल्डरची जागा घेण्याची शक्यता आहे. तो कदाचीत दक्षिण आफ्रिकेकडून ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.

रहाणे नुकताच आयपीएल 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. मात्र, त्याला यंदा फार काही खास करता आलेले नाही. त्याने 13 सामने खेळले, ज्यात त्याने 242 धावा केल्या. मात्र, त्याआधी त्याच्या नेतृत्वात मुंबईने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते.

दरम्यान लीसेस्टरशायरशी जोडल्याबद्दल रहाणे म्हणाला, 'मी लीसेस्टरशायरबरोबर खेळताना मिळालेल्या आणखी एका संधीबद्दल मी उत्सुक आहे. '

त्याचबरोबर त्याने सांगितले की त्याने या संघाचे गेल्यावर्षीचे निकाल पाहिले असून त्याने तो प्रभावित झाला. त्याचबरोबर या संघाच्या यशात योगदान देण्यात उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले.

Ajinkya Rahane
IND vs ENG: ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला आता इंग्लंडची बारी? दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढण्याची टीम इंडियाला संधी

रहाणे लीसेस्टरशायरशी जुलैच्या मध्यात जोडला जाण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दल लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक क्लाउड हेंडरसन म्हणाले, 'अजिंक्य रहाणेसारखा खेळाडूचे स्वागत करताना लीसेस्टरशायरला आनंद होत आहे. गेल्यावर्षी रहाणेचे वेळापत्रक व्यस्त होते, पण यंदाच्या हंगामात तो खेळणार असल्याने संघासाठी मोठा फायदा आहे.'

याशिवाय ते असेही म्हटले की रहाणेचा अनुभव आणि कौशल्याबरोबरच त्याच्याकडे असलेली नेतृत्व क्षमताही संघाला फायदेशीर ठरेल.

रहाणे यापूर्वी काऊंटीमध्ये हॅम्पशायरकडून खेळला आहे. तसेच त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याचाही चांगला अनुभव आहे.

रहाणेने इंग्लंडमध्ये भारतासाठी 16 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 864 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतके केली आहेत. तो इंग्लंडमध्ये 9 वनडे सामनेही खेळला आहे, ज्यात त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 350 धावा केल्या होत्या.

रहाणेने त्याच्या कारकि‍र्दीत आत्तापर्यंत 188 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 39 शतकांसह 13225 धावा केल्या आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 182 सामन्यांत 10 शतकांसह 6475 धावा केल्या आहेत. त्याने 262 टी20 सामने खेळले असून 2 शतकांसह 6383 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.