Piyush Chawla Son: बाप तसा बेटा! पीयूष चावलालाही करता येईना ७ वर्षांच्या लेकाच्या फिरकीचा सामना Video

Piyush Chawla Son Video: पीयूष चावलाने त्याच्या ७ वर्षाच्या मुलाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो फिरकी गोलंदाजी करताना दिसत आहे.
Piyush Chawla Son Bowling
Piyush Chawla Son BowlingSakal
Updated on

Piyush Chawla's Son Bowling Video: आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या मुलांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. आता अशीच शक्यता पीयूष चावलाच्या मुलाचीही दिसत आहे. त्याचाही मुलगा लवकरच क्रिकेटमध्ये चमकताना दिसू शकतो. सध्यातरी पीयूष चावलाने शेअर केलेल्या व्हिडिओतून तरी असे चित्र दिसत आहे.

पीयूष चावलाने सोशल मीडियावर त्याचा ७ वर्षांचा मुलगा अद्विकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच तो फिरकी गोलंदाजी करताना दिसत आहे.

चावलाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की अद्विक त्याच्या फिरकी गोलंदाजीने अनेकदा फलंदाजी करणाऱ्या पीयूष चावलालाही बुचकाळ्यात टाकत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पीयूष चावलाने लिहिलंय की 'घरी विकेंटची सकाळ आमच्यासाठी अशी सुरू होते.'

Piyush Chawla Son Bowling
IPL 2024, Video: चावलानं हेडला कॅच आऊट, तर क्लासेनला क्लिन-बोल्ड करत SRH ला दिलेला धक्का; 'हा' विक्रमही केला नावावर

दरम्यान अद्विकने यापूर्वीही अनेकदा त्याच्याकडे क्रिकेट खेळण्याची चांगली क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे. आयपीएल दरम्यान देखील तो मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंबरोबर गमतीने क्रिकेट खेळत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

तसेच काही दिवसांपूर्वीच पीयूष चावलाने अद्विकचा लेग-स्पिन आणि ऑफ-स्पिन चेंडू टाकतानाचा व्हिडिओ शेअर केले होते.

Piyush Chawla Son Bowling
Cricket Funny Moments: 'जा बॉलच देत नाय...', भारतीय फलंदाजाने Six हाणला, अन् चिडलेला तो चेंडू न देण्यावर ठाम राहिला

पीयूष चावलाने मुरादाबाद येथे कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत २९ नोव्हेंबर २०१३ रोजी अनुभूती चौहानसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर २४ मार्च २०१७ रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्याचं नाव त्यांनी अद्विक ठेवलं. दरम्यान पीयूष चावला स्वत: फिरकीपटू असल्याने क्रिकेट आणि फिरकी गोलंदाजीचे धडे अद्विकला घरातूनच मिळाले आहेत.

पीयूष चावलाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत ३ कसोटी, २५ वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ७, वनडेच ३२ आणि टी२०मध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने आयपीएलमध्ये १९२ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १९२ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत युजवेंद्र चहलनंतर (२०५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.