Shikhar Dhawan Retirement: शिखर धवन मुलगा जोरावरच्या आठवणीने भावूक; म्हणाला, त्याला हे माहित...

Shikhar Dhawan Son Zoravar : भारताचा स्टार सलालीवीर शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Shikhar Dhawan Retirement
Shikhar Dhawan Retirementesakal
Updated on

Shikhar Dhawan retirement : भारताचा स्टार सलालीवीर शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टीम इंडियाचा 'गब्बर' २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि शनिवारी त्याने निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर तो काहीसा इमोशनल झालेला पाहायला मिळाला. त्याला त्याचा मुलगा जोरावर ( Zoravar) याची आठवण आली. जोरावर हा धवनची घटस्फोटीत पत्नी आयेशासोबत लंडनला राहतो.

वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक असलेल्या धवनने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितले की, ''निवृत्तीचा निर्णय माझ्यासाठी कठीण नव्हता, परंतु तो भावनिक होता.''

Shikhar Dhawan Retirement
Shikhar Dhawan's Retirement: शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती, पाहा पोस्ट

यावेळी धवनने मुलगा जोरावची आठवण येत असल्याचे म्हटले. त्याने सांगितले की,'' जोरावर आता ११ वर्षांचा आहे. मला आशा आहे की त्याला माझ्या निवृत्तीबद्दल आणि माझ्या क्रिकेट प्रवासाबद्दल सर्व माहिती असेल, परंतु त्याने मला क्रिकेटपटूपेक्षा एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवावे. असा चांगला माणूस जो चांगले काम करतो आणि त्याच्या आसपासच्या लोकांमध्ये सकारात्मकता आणतो. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे.''

धवनचा मुलगा जोरावर त्याची माजी पत्नी आयेशा मुखर्जीसोबत राहतो. आपल्या मुलापासून दूर राहणे आणि त्याला मोठा होताना पाहण्याच्या संधीपासून वंचित राहणे, किती कठीण आहे हे धवनने अनेकदा सांगितले आहे. गेल्या वर्षी त्याने आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

Shikhar Dhawan Retirement
WI vs SA T20I : 6,6,6,6,6,6,6...! निकोलस पूरनसह विंडीजचे तिघं दक्षिण आफ्रिकेवर भारी पडले अन्...

शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द...

शिखर धवनने २०१० मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयसीसी स्पर्धेतील स्टार अशी त्याची ओळख आहे. त्याने १६७ वन डे सामन्यांत ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या आणि त्यात १७ शतकं व ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. ३४ कसोटी सामन्यांत त्याच्या नावावर ७ शतकं व ५ अर्धशतकांसह २३१५ धावा आहेत. ६८ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने १७५९ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.