हॅप्पी बर्थ डे सूर्या दादा! Mr 360 सूर्यकुमार यादवच्या ट्वेंटी-२०तील शतकाची झलक अन् सॉलिड विक्रम

Suryakumar Yadav Birthday: सूर्यकुमार यादव शनिवारी त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाका.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavSakal
Updated on

Suryakumar Yadav Records: क्रिकेटमध्ये चौफेर फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स मिस्टर ३६० असं म्हटलं जातं. जसा तो चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो, तसाच भारताचाही एक खेळाडू आहे, जो यासाठी ओळखला जातो, तो म्हणजे सूर्यकुमार यादव. त्यामुळे सूर्यकुमारलाही भारताचा मिस्टर ३६० असं म्हटलं जातं. शनिवारी (१४ सप्टेंबर) सूर्यकुमारचा ३४ वा वाढदिवस आहे.

वयाच्या तिशीमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सूर्याने अगदी कमी वेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याला वनडे आणि कसोटीत जरी फारसं यश अद्याप मिळालं नसलं तरी टी२० क्रिकेटमध्ये मात्र त्याने नवे कीर्तिमान रचले आहे.

तो टी२० क्रिकेट क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाजही बनला. इतकंच नाही, तर आता त्याच्याकडे भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. सूर्यकुमारने मार्च २०२१ मध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्याच डावात खणखणीत अर्धशतक ठोकलं होतं.

Suryakumar Yadav
IND vs SL 3rd T20I - SuryaKumar Yadav ची चूक अन् सामना Super Over मध्ये गेला; कॅप्टन गोंधळला, Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.