Team India Update: भारतीय संघात पुरेशी संधी नाही मिळाली, गोलंदाजाने निवृत्तीची वाट धरली

Indian bowler announces retirement: भारतासाठी ६ सामने खेळणाऱ्या गोलंदाजाने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Barinder Sran
Barinder Sranesakal
Updated on

Barinder Sran announced retirement : डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर सरन याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३१ वर्षीय सरनने जानेवारी ते जून २०१६ दरनम्यान सहा वन डे आणि दोन ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

सरन इंस्टाग्रामवर लिहीले, “जेव्हा मी कृतज्ञ अंतःकरणाने माझ्या प्रवासाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा मला समाधान वाटते. क्रिकेटने मला असंख्य आणि अविश्वसनीय आठवणी दिल्या आहेत. २०१६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोच्च सन्मान मला मिळाला होता. माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द जरी छोटी असली तरी, तयार झालेल्या आठवणी कायमच माझ्याकडून जपल्या जातील. ज्यांनी माझ्या संपूर्ण प्रवासात मला साथ दिली, त्यांचा सदैव ऋणी राहीन.”

Barinder Sran
LLC 2024 Auction: Shikhar Dhawan, ख्रिस गेल गुजरात संघाकडून खेळणार; धवल कुलकर्णी ठरला सर्वात महागडा खेळाडू

कोण होता बरिंदर सरन ?

किंग्ज इलेव्हन पंजाबची (Kings XI) जाहिरात पाहून एका शेतकऱ्याचा मुलगा सरनने क्रिकेटमध्ये प्रवेश केला. ज्यात नव्या खेळाडूंना निवड चाचणीत भाग घेण्यासाठी बोलावले होते. सरनने यापूर्वी हरियाणातील भिवानी बॉक्सिंग क्लबमध्ये बॉक्सर म्हणून प्रशिक्षण घेतले होते. आयपीएलमध्ये निवड होण्यापूर्वी तो टेनिस क्रिकेट खेळत होता. २०१५ च्या आयपीएल (IPL) लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने निवडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तो खेळला.

बरिंदर सरनची कारकीर्द

३१ वर्षीय सरनने जानेवारी ते जून २०१६ दरम्यान सहा वन डे आणि दोन ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जून २०१६ मध्ये झिम्बाब्वेच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी सरनची भारतीय संघात निवड झाली होती. हरारे येथील दुसऱ्या सामन्यात त्याने १० धावांत ४ बळी घेत सामनावीर ठरला. सरनने २०११ ते २०२१ दरम्यान १८ प्रथम श्रेणी, ३१ लिस्ट अ आणि ४८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. IPL मध्ये त्याने राजस्थान रॉयल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझेझ हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे आणि गुजरात टायटन्ससाठी नेट गोलंदाज म्हणून काम केले आहे. सरनने शेवटचा स्पर्धात्मक सामना फेब्रुवारी २०२१ मध्ये पंजाबसाठी खेळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.