Chetan Sakariya Wedding : गुपचुप गुपचुप...! टीम इंडियाचा खेळाडू अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा नुकताच संपला असून आता श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. दरम्यान, टीम इंडियाचा एक खेळाडू लग्नबंधनात अडकला आहे.
Chetan Sakariya Wedding
Chetan Sakariya Weddingsakal
Updated on

Chetan Sakariya Wedding : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा नुकताच संपला असून आता श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. दरम्यान, टीम इंडियाचा एक खेळाडू लग्नबंधनात अडकला आहे. या खेळाडूची गेल्या वर्षीच एंगेजमेंट झाली होती. भारतीय खेळाडू जयदेव उनाडकटने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून चाहत्यांना या खेळाडूच्या लग्नाची माहिती दिली. हा खेळाडू दुसरा कोणी नसून 26 वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाज चेतन साकारिया आहे.

Chetan Sakariya Wedding
Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीवर मोदी सरकार मेहरबान! खेळाडूंसाठी खोलला शासकीय खजिना

भारतीय वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने मेघना जंबूचाशी लग्न केले आहे. जयदेव उनाडकट यांनी ही माहिती दिली आहे. उनाडकटने त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. हे दोन्ही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाकडून खेळतात.

चेतनचे अभिनंदन करताना, जयदेव उनाडकटने इंस्टाग्रामवरील फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले, "प्रिय चेतन, तुझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मी तुला काही चमकदार स्पेल टाकताना आणि सामने जिंकताना पाहिले आहे. पण साहजिकच हा तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा स्पेल आहे.

Chetan Sakariya Wedding
Olympic History of India : ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक केव्हा जिंकले? प्रथम केव्हा झाले होते सहभागी?

चेतन साकरीयाची आतापर्यंतची कारकीर्द

चेतन साकारियाला गेल्या काही काळापासून आयपीएलमध्ये सतत संधी मिळत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर चेतन साकारियाने आयपीएलमध्ये पदार्पण केले. चेतन 2024च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. यापूर्वी, चेतन 2023 च्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. त्याने राजस्थान रॉयल्स संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तो टीम इंडियाकडूनही खेळला.

Chetan Sakariya Wedding
MS Dhoni Investment: 'कॅप्टन कूल' धोनीने 'या' कंपनीत केली 200 कोटींची गुंतवणूक; ओला-उबेरला देणार टक्कर

चेतनने जुलै 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु केवळ 1 एकदिवसीय आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर त्याला वगळण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3 विकेट आहेत. तो काही काळापासून दुखापतीशी झुंजत होता. आयपीएल 2024 मध्येही तो एकही सामना खेळू शकला नाही आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये दुलीप ट्रॉफीमध्येही खेळू शकला नाही. दुखापतींच्या समस्येमुळे तो आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेकवेळा मैदानापासून लांब राहिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.