Kenya Cricket संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून भारतीय माजी क्रिकेटपटूची हाकलपट्टी, कारण घ्या जाणून

Indian Former Cricketer: डोड्डा गणेश यांची केनिया पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात असून केनियाच्या शीख युनियन क्लबमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे.
Dodda Ganesh
Dodda Ganeshesakal
Updated on

Dodda Ganesh: भारताचे माजी क्रिकेटपटू डोड्डा गणेश यांची केनियाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर गेल्या महिन्यात नियुक्ती झाली होती. मात्र अवघ्या एका महिन्यानंतर त्यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

त्यांची नियुक्ती 'अनियमित' असल्याचा दावा करून, क्रिकेट केनिया (CK)ने यांची हाकलपट्टी केली आहे. गणेश यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, केनिया क्रिकेट बोर्डाने त्यांच्या घटनेचा हवाला देऊन नियुक्तीला मान्यता न देण्याचा निर्णय स्पष्ट केला आहे.

“२८ ऑगस्ट २०२४ रोजी पास झालेल्या केनिया क्रिकेट बोर्डाच्या ठरावानुसार आणि क्रिकेट केनियाच्या अनुच्छेद ५.९ आणि ८.४.३ अंतर्गत नमुद केलेल्या घटनेनुसार आम्ही तुम्हाला सूचित करू इच्छितो की कार्यकारी मंडळाने तुम्हाला मान्यता देण्यास नकार दिला आहे,” असे सीकेच्या महिला क्रिकेट संचालक परलीन ओमामी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे.

Dodda Ganesh
स्थानिक टी-२० लीगमधून होऊ शकतो भ्रष्टाचार , निवृत्त होताना ICC ANTI-CORRUPTION Department प्रमुख मार्शल यांनी व्यक्त केली भीती

केनियाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद गेले असले तरी गणेश यांनी ऑगस्टमध्ये केनियातील शीख युनियन क्लबमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते प्रशिक्षक लॅमेक ओन्यांगो यांच्या जागी नियुक्त झाले आहेत.

शीख युनियन क्लबमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गणेश यांनी वन-डे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप या दोन्हीसाठी देशाला पात्र करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय व्यक्त केले होते. त्यासाठी स्थानिक लीग सामने आणि फिटनेस चाचण्या घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले होते.

"वन-डे वर्ल्ड कप आणि ट्वेंटी-२० दोन्ही सामन्यांसाठी पात्रता मिळवणे हे माझे उद्दिष्ट आहे. परंतु त्याआधी आपण तयारी सुरू केली पाहिजे. आमच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही. आम्ही तयारी सुरू केली असून हळूहळू प्रगती करत आहोत," असे गणेश म्हणाले होते.

Dodda Ganesh
त्याला नॉनवेज आवडायचं, पण माझ्यासाठी १ महिना वेज खाल्लं, Dhoni च्या रूममेटने सांगितली 'ती' आठवण

डोड्डा गणेश यांची कारर्किद

गणेश यांनी १९९७ मध्ये भारतासाठी चार कसोटी सामने व एक वन-डे सामना खेळला आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यातील दुसऱ्या डावात त्यांनी गॅरी कर्स्टन यांची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १०४ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ३६५ विकेट्स घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()