भारतीय महिला संघाची उपकर्णधार व सलामीवीर स्मृती मानधना ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या महिला बिग बॅश लीगच्या ( WBBL) दहाव्या हंगामासाठी ऍडलेड स्ट्राईकर्स या संघाकडून खेळणार आहे. मानधना सोबतच आणखी १८ भारतीय महिला क्रिकेटपटूंची नावं WBBLच्या प्लेअर ड्राफ्टमध्ये आहेत. स्मृती मानधना याआधी ब्रिस्बेन हिट, होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी थंडर या संघांकडून WBBL मध्ये खेळली आहे.
महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कर्णधार स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने विजेतेपद पटकावले होते. WPL व्यतिरिक्त स्मृती आणि स्ट्राईकर्स व RCBचे प्रशिक्षक ल्युक विलियम्स यांनी यापूर्वी दी हंड्रेड लीगमध्ये साऊथर्न ब्रेव्ह संघासाठी एकत्र काम केले आहे.
" ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होते आणि स्ट्राईकर्ससारख्या यशस्वी संघात संधी मिळाल्याबद्दल मी आनंदीत आहे. ल्युकसोबत मी यापूर्वीही काम केले आहे आणि तो अनुभव खूप फायद्याचा ठरेल," स्मृती म्हणाली.
प्रशिक्षक विलियम्स यांनी मानधनासोबत पुन्हा एकत्र काम करता येईल, म्हणून आनंद व्यक्त केला आहे. "स्मृतीकडे अपवादात्मक प्रतिभा आहे आणि स्ट्रायकर्समध्ये तिचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. तिची तांत्रिक कौशल्ये, अनुभव ही आमच्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे."
WBBL प्लेयर ड्राफ्टमध्ये एकूण १९ भारतीय महिला क्रिकेटपटूंनी नावं नोंदवली आहेत. यामध्य भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. स्मृती मानधनाने १४१ ट्वेंटी-२० सामन्यांत ३४९३ धावा केल्या आहेत. त्यात २६ अर्धशतकांचा समावेश आहे आणि ४७१ चौकार व ६८ षटकारांचा समावेश आहे.
हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, तितास साधू, आशा सोभना, राधा यादव, अमनज्योत कौर, यास्तिका भाटिया, शिखा पांडे, स्नेह राणा, हेमलता दयालन, संजना संजीवन, मन्नत कश्यप, मेघना सब्बीनेनी, वेदा कृष्णमुर्ती, मोना मेश्राम, मेघना सिंग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.