वादाला फुटले तोंड! 'अभिनेत्रीसोबत अफेअर, टॅटू असेल तरच संघात निवड...' टीम इंडियाचा माजी खेळाडू BCCIवर कडाडला

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे.
team india
team indiasakal
Updated on

Indian Team Tour Of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. टी-20 संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. शुभमन गिलला वनडे आणि टी-20 या दोन्ही फॉरमॅटचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. या दौऱ्यातूनच संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर जबाबदारी स्वीकारणार आहेत.

team india
Hardik Pandyaच्या इन्स्टावर नवी खळबळ? एकीकडे नताशापासून घटस्फोटाची घोषणा, तर दुसरीकडे 25 वर्षीय अभिनेत्रीला केलं फॉलो

पण टीम इंडियाच्या नावाची घोषणा झाल्यापासून संघ निवडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवण्यावर आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर चांगली कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांना संघातून वगळण्यावर दिग्गज माजी खेळाडूंकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आता आणखी एका माजी खेळाडूने संघ निवडीवर आपले वक्तव्य केले असून त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या खेळाडूने संघाच्या निवड व्यवस्थेवर गंभीर आरोप केले आहेत.

आतापर्यंत हरभजन सिंग, मोहम्मद कैफ आणि शशी थरूर यांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता याच क्रमवारीत भारताचे माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथने आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

team india
Hardik Pandya : वादळानंतर तो सावरला! नताशासोबत घटस्फोटानंतर 2 दिवसांनी हार्दिकने केला नवीन बिजनेस लॉन्च

काय म्हणाला बद्रीनाथ?

भारतीय संघाचा माजी खेळाडू सुब्रमण्यम बद्रीनाथने ऋतुराज गायकवाडला दोन्ही संघात स्थान न मिळाल्याने आणि रिंकू सिंगला वनडे संघात स्थान न मिळाल्याने वादग्रस्त टिप्पणी केली आहे.

क्रिक डिबेट विथ बद्रीवर बोलताना तो म्हणाला की, काहीवेळा असे दिसते की कामगिरीव्यतिरिक्त, संघात निवड होण्यासाठी तुम्हाला दुसरी प्रतिमा आवश्यक आहे. रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड यांसारख्या खेळाडूंची भारतीय संघात निवड होत नाही, तेव्हा असे वाटते की संघात निवड होण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्रीशी संबंध, एक चांगला मीडिया मॅनेजर आणि शरीरावर टॅटू आवश्यक आहेत.

ऋतुराजची कामगिरी होती कशी?

ऋतुराज गायकवाडने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन डावात 7, 77 आणि 49 धावा केल्या. याशिवाय रिंकू सिंगनेही या स्पर्धेत चमकदार कामगिरी केला. सुब्रमण्यम बद्रीनाथ यांची ही टिप्पणी काही तासांतच व्हायरल झाली आहे. बद्रीनाथ यांचे हे विधान मूळ तमिळ भाषेत आहे, ज्याचे अनेकांनी भाषांतर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com