IPL Auction 2025 Updates: आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी (२५ नोव्हेंबर) दहाही फ्रँचायझींचा भारतीय खेळाडूंवर भर होता. पहिल्या दिवशी प्रमुख खेळाडूंसह प्रमुख संघ तयार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्वरित रिकाम्या असलेल्या जागांसाठी चुरस झाली. अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाजांसाठी अधिक पसंती होती. त्यामुळे भुवनेश्वर आणि दीपक चहर यांच्यासाठी स्पर्धा झाली.
भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची भारतीय संघाचे दरवाजे आता जवळपास बंद झालेले असली तरी आयपीएलमध्ये मात्र त्यांची चलती आहे. भुवनेश्वरसाठी बंगळूरने १०.७५ कोटी, तर चहरसाठी मुंबई इंडियन्सने ९.२५ कोटी रुपये मोजले.