IND vs BAN 1st Test: श्रेयस अय्यरचा कसोटी संघातील पत्ता कट होणार; १९ वर्षीय Musheer Khan ला पदार्पणाची संधी मिळणार

Duleep Trophy 2024: युवा फलंदाज मुशीर खान याने दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये भारत ब संघाकडून खेळताना दीडशतकी खेळी केली आहे.
Musheer Khan
Musheer Khan esakal
Updated on

India vs Bangladesh Test Series Duleep Trophy : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टीने दुलीप ट्रॉफी स्पर्धेला महत्त्व प्राप्त झालं आहे. बऱ्याच वर्षांची या स्पर्धेत टीम इंडियातील स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. दुलीप ट्रॉफी ही आगामी कसोटी मालिकासाठी टीम इंडिया निवड करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळेच या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत.

१९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी येत्या काही दिवसांत भारतीय संघ जाहीर केला जाईल. शक्यतो दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीनंतर हा संघ जाहीर होईल. त्यामुळेच कालपासून सुरू झालेल्या दुलीप ट्रॉफीवर सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आदी खेळाडूंना अपयश आलेले दिसले. पण, यात १९ वर्षांच्या मुशीर खानने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Musheer Khan
Duleep Trophy 2024: टीम इंडियात एन्ट्री घेऊ पाहणारा स्टार फलंदाज फेल, निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; रोहितची चिंता वाढली

शुभमन गिलच्या भारत अ संघाविरुद्ध भारत ब संघाची अवस्था ७ बाद ९४ अशी झाली होती. अशात मुशीर खान मैदानावर शड्डू ठोकून उभा राहिला. त्याला नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नवदीप सैनीची ( Navdeep Saini) साथ मिळाली. मुशीरने पहिल्या दिवशी शतक झळकावून निवड समितीचे लक्ष वेधले. आज दुसऱ्या दिवशी त्याने शतकताचे दीडशतकात रुपांतर केले आहे आणि त्याची वाटचाल द्विशतकाच्या दिशेने सुरू आहे. भारत ब संघाने १०९ षटकांत ७ बाद २९० धावा केल्या आहेत.

मुशीर ३६५ चेंडूंत १६ चौकार व ४ षटकारांसह १७४ धावांवर खेळतोय, तर नवदीप सैनी ११७ चेंडूंचा सामना करून ४२ धावांवर खेळपट्टीवर उभा आहे. दोघांनी आठव्या विकेटसाठी आतापर्यंत १९० धावांची भागीदारी केली आहे. मुशीरच्या या खेळीमुळे निवड समिती त्याला बांगलादेश कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी देण्याची शक्यता बळावली आहे.

Musheer Khan
Rishabh Pant: आला १० चेंडू खेळून तंबूत परतला! Duleep Trophy 2024 त शुभमनने गेम केला

दुलीप ट्रॉफीत ८व्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी...

  • 197 - अभिषेक नायर आणि रमेश पोवार विरुद्ध उत्तर विभाग, ग्वाल्हेर, 2010

  • 190* - मुशीर खान आणि नवदीप सैनी विरुद्ध इंडिया ए, बंगळुरू, 2024

  • 178 - बाबा इंद्रजित-विजय गोहिल विरुद्ध इंडिया ब्लू, कानपूर, 2017

  • 146 - दिनेश कार्तिक आणि मरीपुरी सुरेश विरुद्ध सेंट्रल झोन, बंगळुरू, 2009

  • 145 - निखिल चोप्रा आणि शक्ती सिंग विरुद्ध सेंट्रल झोन, गुवाहाटी, 1999

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.