कर हर मैदान फतेह... Asia Cupसाठी टीम इंडिया पोहोचली श्रीलंकेत! पहिला सामना पाकिस्तानशी; जाणून घ्या शेड्यूल

Team India Vs Pakistan Women's Asia Cup 2024: आशिया कप 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ श्रीलंकेत पोहोचला आहे.
Indian team arrive in Sri Lanka for Women Asia Cup 2024 Full Schedule Match Timings And Venue
Indian team arrive in Sri Lanka for Women Asia Cup 2024 Full Schedule Match Timings And Venuesakal
Updated on

Indian team arrive in Sri Lanka for Women Asia Cup 2024: आशिया कप 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. यावेळी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टीम इंडिया 19 जुलैला आशिया कप 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 19 जुलैला पाकिस्तानशी होणार आहे. पुन्हा एकदा टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आली आहे.

Indian team arrive in Sri Lanka for Women Asia Cup 2024 Full Schedule Match Timings And Venue
ब्रेकिंग : श्रीलंकन क्रिकेटपटूची हत्त्या, पत्नी अन् २ मुलांसमोर घातल्या गोळ्या

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये भारत आणि बांगलादेशचे खेळाडू दिसत आहेत. फोटोंमध्ये कॅप्टन हरमनप्रीत कौर, श्रेयंका पाटील आणि जेमिमाह रॉड्रिग्ज विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत.

आशिया कप 2024 मध्ये टीम इंडियाचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (१९ जुलै)

  • भारत वि UAE (२१ जुलै)

  • भारत विरुद्ध नेपाळ (२३ जुलै)

Indian team arrive in Sri Lanka for Women Asia Cup 2024 Full Schedule Match Timings And Venue
Natasa Stankovic : हार्दिकची नताशा कुठे निघाली? बॅगा घेऊन मुलासोबत दिसली विमानतळावर, Video Viral

टीम इंडियाचा अ गटात समावेश

आशिया कप 2024 साठी भारतीय महिला क्रिकेट संघाला अ गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात टीम इंडियासोबत पाकिस्तान, नेपाळ आणि यूएईच्या संघांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश, थायलंड, श्रीलंका आणि मलेशिया या संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कप 2024 चा अंतिम सामना 28 जुलै रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.