India vs Bangladesh: बांगलादेशच्या राणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून पंजाबच्या ब्रारला आमंत्रण

Indian Team Invited Gurnoor Brar for test series against Bangladesh: पंजाबचा उंचपुरा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार याला अचानक भारतीय संघाच्या सरावासाठी पाचारण करण्यात आले आहे.
Gurnoor Brar
Gurnoor Braresakal
Updated on

India vs Bangladesh: चेन्नई, ता. १४ ः प्रत्यक्ष सामन्यात कोणती आव्हाने असू शकतील त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण करून सराव करायची ही भारतीय संघाची खासियत आहे. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना हाच पवित्रा कायम राहिला आहे. बांगालदेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अशाच प्रकारे सराव भारतीयांनी सुरू केला आहे.

पंजाबचा उंचपुरा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार याला अचानक भारतीय संघाच्या सरावासाठी पाचारण करण्यात आले. गुरनूर ब्रार हा प्रथम श्रेणीचे पाच सामने खेळलेला असून तो गेल्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा सदस्यही राहिलेला आहे. ६ फूट ४.५ इंच उंची त्यामुळे चेंडूला अधिक उसळी आणि वेग ही त्याची खासियत आहे. त्याला अचानक पाचारण करण्यासाठी कारण ठरला आहे तो बांगलादेश संघात असलेला नवोदित वेगवान गोलंदाज नाहिद राणा.

Gurnoor Brar
Duleep Trophy 2024: सर्फराझ, रिंकू सिंग अपयशी, मात्र भारत ब संघासाठी कर्णधार अभिमन्यूची शतकी झुंज

नाहिद राणाने नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत चांगलाच प्रभाव पाडला. रावळपिंडी येथील कसोटीत त्याने पाच विकेट मिळवून निर्णायक कामगरी केली. त्यामुळे बांगलादेशने दुसरा कसोटी सामनाही जिंकला होता. राणाही ६ फूट ५ इंच उंची असलेला वेगवान गोलंदाज आहे आणि तो गुडलेंथच्या टप्प्यावरून अधिक उसळी घेणारे चेंडू टाकू शकतो. त्याचा सामना करण्यापूर्वी त्याच्यासारखा उंचपुरा वेगवान गोलंदाज भारतीय संघ व्यवस्थापनाने शोधला आणि ब्रारला चेन्नईतील सराव शिबिरासाठी पाचारण करण्यात आले.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज असे भारताकडे वेगवान गोलंदाज असल्यामुळे फिरकीस अधिक सहाय्य करणारी चेन्नईतील पारंपरिक खेळपट्टी नसेल, असे सांगण्यात येत आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना समान संधी देणारी खेळपट्टी असू शकेल. चेंडूची उसळीही चांगल्या प्रमाणात असण्याची शक्यता असल्यामुळे राणा भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकेल.

Gurnoor Brar
Video: बांगलादेश मालिकेसाठी बुमराहचा पर्याय मिळाला; Duleep Trophy त एकाच सामन्यात घेतल्या ९ विकेट्स

संघात प्रथमच दाखल झालेले गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी वेगवान गोलंदाजांना टप्पा आणि दिशा याचे आज नेटमध्ये मार्गदर्शन केले.

बांगलादेशचा संघ उद्या रविवारी चेन्नईत दाखल होत आहे. माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्याविरोधात झालेल्या अभूतपूर्व आंदोलनामुळे बांगलादेशमधील परिस्थिती चिघळली होती. या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या बांगलादेश संघाला अधिक सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.