IND vs WI Womens: भारतीय संघाने महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजवर २० धावांनी विजय मिळवला आहे. मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीमध्ये स्पर्धेबाहेर गेलेला भारतीय महिला संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी सज्ज झाला आहे. त्याची झलक विंडीजविरूद्धच्या सामन्यातील विजयाने पहायला मिळाली. भारताच्या या विजयात गोलंदाजांनी महत्वाची कामगिरी पार पाडली.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी फारशी चांगली सुरूवात केली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर १ धाव करत परतली. परंतु चौथ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने ५२ धावांची नाबाद खेळी केली. जेमिमा व्यतिरिक्त इतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. भारताने ८ विकेट्स गमावत वेस्ट इंडिज १४२ धावांचे सोपे आव्हान दिले.
प्रत्युत्तरासाठी आलेल्या वेस्ट इंडिज सलामीजोडीला रेनुका सिंग व पुजा वस्त्राकरने ० आणि १ धावा करत माघारी पाठवत मोठे धक्के दिले. ५व्या क्रमांकावर आलेल्या चीनेल हेन्रीने संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर फलंदाजांकडून तिला साथ मिळाली नाही. त्यामुळे विंडीजला भारतीय गोलंदाजांनी १२१ धावांवरती रोखले. ज्यामध्ये पूजाला विंडीजचे ३ विकेट्स घेण्यात यश आले. भारताने विंडीजवर २० धावांनी मात केली.
हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष ( यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया ( यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन
राखीव खेळाडू - उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.