Kedar Jadhav ची भारतीय संघात एन्ट्री, BCCI अध्यक्षांचा मुलगाही टीममध्ये! चाहत्यांसाठी क्रिकेटची मेजवानी

Kedar Jadhav Fans Team India : दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका,न्यूझीलंड आदी संघांसोबत टीम इंडिया दोन हात करणार आहे. शनिवारी या तगड्या स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे.
Kedar Jadhav
Kedar Jadhavesakal
Updated on

Indian Team for Hong Kong Sixes 2024:करण्यात आली आहे. १ ते ३ नोव्हेंबर अशी तीन दिवसीय ही स्पर्धा रंगणार आहे आणि भारत व पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धींना क गटात एकत्रित ठेवण्यात आले आहे. याशिवाय संयुक्त अरब अमिरातीही या गटात आहे. एकूण १२ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आदी तगडे संघही मैदानावर उतरणार आहेत. या स्पर्धेसाठी आताच भारतीय संघ जाहीर केला गेला आहे. या संघाचे नेतृत्व रॉबिन उथप्पा करणार आहे.

सात वर्षांनंतर हाँग काँग क्रिकेट सिक्सेस ( Hong Kong Sixes ) २०२४ ही स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. २००५ मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती.पाकिस्तानने एकूण ४ वेळा या स्पर्धेत विजेतेपद भूषवले आहे.

Kedar Jadhav
Rishabh Pant DC : ऋषभ पंतला Delhi Capitals सोबत नाही राहायचंय? कर्णधाराच्या 'त्या' ट्विटने चाहते संभ्रमात

स्पर्धेचे नियम

  • एका संघात सहा खेळाडू

  • ५ षटकांचा एक डाव, यष्टीरक्षक वगळता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा प्रत्येक खेळाडू एक षटक टाकतो.

  • पाच ते सहा चेंडूंचे षटक असते. अंतिम सामन्यात आठ चेंडूंचे षटक

  • वाईड आणि नो-बॉलसाठी दोन धावा

  • षटकं पूर्ण होण्यापूर्वी पाच विकेट पडल्यास, शेवटचा उरलेला फलंदाज पाचव्या फलंदाजासह धावपटू म्हणून खेळेल

  • प्रत्येक जिंकलेल्या सामन्यासाठी संघाला दोन गुण मिळतात.

Kedar Jadhav
India vs Pakistan महामुकाबला; कट्टर स्पर्धक एकाच गटात, तारीख, वेळ ठरली

भारताचा संघ - रॉबिन उथप्पा ( कर्णधार), भरत चिप्ली, केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी

केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने भारताकडून ७३ वन डे सामन्यांत १३८९ धावा केल्या आहेत आणि २७ विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-२०त ९ सामन्यांत १२२ धावा त्याच्या नावावर आहे. या संघात बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.