१३ वर्षीय Vaibhav Suryavanshi ने रचला इतिहास; ठरला युवा शतकवीर, मोडला बाबर आजमचा विक्रम

INDU19 vs AUSU19 : भारताच्या सीनियर खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये काल ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचवेळी भारताच्या युवा खेळाडूंनी चेन्नईत विक्रमी खेळी केली.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi esakall
Updated on

INDU19 vs AUSU19 Vaibhav Suryavanshi : भारतीय संघाने काल कानपूर कसोटीत बांगलादेशच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून देताना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड नोंदवला. त्यानंतर भारताच्या अन्य फलंदाजांनी वेगवान शतक, वेगवान दीडशतक, वेगवान द्विशतक अन् वेगवान २५० धावांचा विश्वविक्रम भारताने नावावर केला. तेच चेन्नईत भारताच्या युवा खेळाडूंनी वादळ आणलं आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या १९ वर्षांखालील संघामध्ये कसोटी सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑसी गोलंदाजांना चांगला चोप दिला आहे. विहान मल्होत्रा आणि वैभव सूर्यवंशी यांनी दमदार खेळ करताना भारताला १३.१ षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांच्या खेळीने प्रेरित होऊन वैभवने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. १९ वर्षांखालील कसोटीत अर्धशतक झळकावणारा तो युवा फलंदाज ठरला. १३ वर्ष व १८७ दिवसांच्या वैभवने ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. नजमूल शांतोने २०१३ मध्ये श्रीलंकेविरदु्ध १४ वर्ष व २३१ दिवसांचा असताना अर्धशतक झळकावले होते. शांतो हा सध्या बांगलादेशचा कर्णधार आहे.

Vaibhav Suryavanshi
IND vs BAN, 2nd Test: वरूण राजानंतर टीम इंडियाकडून 'वर्ल्ड रेकॉर्ड्स'ची बरसात! एकाच दिवशी १८ विकेट्स अन् ट्वेंटी-२० स्टाईल बॅटिंग

बिहारच्या वैभवने मागच्या वर्षी मुंबईविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ही फटकेबाजी सुरू ठेवताना ५८ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि १९ वर्षांखालील कसोटीत हे भारतीयाचे वेगवान शतक ठरले आहे. मन्जोत कार्ला ( १०१) व शुभमन गिल ( १०९) यांचा विक्रम त्याने मोडला. जगात वैभवचा या विक्रमात दुसरा क्रमांक लागला. मोईन अलीने २००५ मध्ये ५६ चेंडूंत शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने १८ षटकांत बिनबाद १२९ धावा केल्या आहेत. वैभव ६० चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह १०२, तर विहान २६ धावांवर खेळतोय..

व्यावसायिक क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर

  • 13y 188d - वैभव सूर्यवंशी वि. AUSU19, चेन्नई, 2024 ( युवा कसोटी)

  • 14y 241d - नजमुल हुसेन शांतो विरुद्ध SLU19, सिलहट, 2013 (युवा वन डे)

  • 15y 48d - बाबर आझम विरुद्ध SLU19, डंबुला, 2009 (युवा वन डे)

  • 15y 105d - नसीर जमशेद विरुद्ध SLU19, कराची, 2005 (युवा कसोटी)

  • 15y 167d - मेहदी हसन मिराझ वि SLU19, मिरपूर, 2013 (युवा कसोटी)

  • 16y 92d - बाबर आझम विरुद्ध WIU19, पामर्स्टन नॉर्थ, 2010 (युवा वन डे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.