IND vs PAK T20WC: भारताने पाकिस्तानला हरवले, तरीही टेंशन कायम; Semi Final चे ‘स्कोअर’ जुळता जुळेना...

India W vs Pakistan W T20 World Cup semi final scenario : भारतीय संघाने महिला ट्वेटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात शेजारी पाकिस्तानला पराभूत केले आणि स्वतःला उपांत्य फेरीच्या शर्यतीत ठेवले. पण...
INDWvsPAKW T20IWC
INDWvsPAKW T20IWCesakal
Updated on

India W vs Pakistan W T20 World Cup Marathi Update: भारतीय महिला संघाने महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले. १०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला कमी षटकांत विजय मिळवणे गरजेचा होता. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारतीय महिला संघाला Net Run Rate मध्ये सुधारणा आवश्यक आहे. ती संधी हरमनप्रीत कौर अँड टीमने गमावली. पाकिस्तानला पराभूत केलं असलं तरी पुढचं गणित जुळता जुळेना... अशी अवस्था टीम इंडियाची झाली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानला अडचणीत आणणारा ठरला. संथ खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून पाकिस्तानी फलंदाजांना भांबवून सोडले. रेणुका सिंगने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर अन्य गोलंदाजांनी टप्प्याटप्प्याने विकेट्सचे सत्र सुरू ठेवले.  अरुंधती रेड्डीने ३ व श्रेयांका पाटीटने २, तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा व आशा सोभना यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

INDWvsPAKW T20IWC
IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

विकेट पडत राहिल्यानं पाकिस्तानच्या फलंदाजांवर दडपण वाढत होते आणि त्यांना चौकारही मिळणे अवघड झाले होते. कर्णधार हरमनप्रीत कौरने गोलंदाजीत वारंवार बदल करून पाकिस्तानी खेळाडूंना सेट होऊ दिले नाही. अनुभवी खेळाडू निदा दारने सर्वाधिक २८ धावा केल्या. मुनीबा अली ( १७), सायेदा शाह ( १४) व कर्णधार फातिमा सना ( १३ ) यांनी योगदान दिले. पण, भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला २० षटकांत ८ बाद १०५ धावांवर रोखले.

स्मृती मानधना ( ७) ला दुसऱ्या सामन्यातही लय सापडली नाही. सादिया इक्बालने पाचव्या षटकात ही विकेट मिळवली. पण, शफाली वर्मा व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी चांगली फटकेबाजी केली. भारताला उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवूनच दोघी खेळत होत्या. पण, १२ व्या षटकात शफाली माघारी परतली. शफालीने ३ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. जेमिमा व हरमनप्रीत कौर विजय मिळवून देतील असे वाटले होते. पण, फातिमा सनाने बाजी उलटवली.. जेमिमा ( २३) व रिचा घोष ( ०) यांना माघारी पाठवून सामना चुरशीचा बनवला.  

INDWvsPAKW T20IWC
IND vs PAK T20WC : what a ball…! पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का, Renuka Singh ने उडवला त्रिफळा, Video

हरमनप्रीत कौर ( २९) आणि दीप्ती शर्मा ( ७ ) यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर बसवले. २४ चेंडू २२ धावांवरून या दोघींनी सामना १२ चेंडूंत ४ धावा असा एकतर्फी केला आणि भारताने ६ विकेट्स ही मॅच जिंकली. हरमनप्रीत २९ धावांवर दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली. विजयासाठी २ धावांची गरज असताना हरमनप्रीत माघारी गेली आणि सजीवन संजनाने चौकार मारून विजय पक्का केला. भारताने १८.५ षटकांत ४ बाद १०८ धावा केल्या.

Team India Semi Final Scenario

भारतीय संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यांचा नेट रन रेट -२.९० असा होता. त्यामुळे अ गटातून उपांत्य फेरीचे स्थान पटकावण्यासाठी त्यांना उर्वरित तीन लढती जिंकणे गरजेचे आहे. त्यापैकी एक सामना ( वि. पाकिस्तान) आज त्यांनी जिंकला, परंतु अजूनही त्यांच्यासमोरील आव्हान कमी झालेले नाही. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतरही भारताचा नेट रन रेट हा -१.२१७ असा राहिला आणि ते पाकिस्तानच्या ( ०.५५५) मागेच आहेत. न्यूझीलंड ( २.९००) व ऑस्ट्रेलिया ( १.९०८ ) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

INDvsPAKWNRR
INDvsPAKWNRResakal

उर्वरित दोन लढतीत त्यांना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया व आशिया चषक विजेत्या श्रीलंकेचा सामना करायचा आहे. या दोन्ही संघांकडून भारताला महत्त्वाच्या स्पर्धेत हार मानावी लागली आहे. त्यामुळे हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे जरा अवघड आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.