INDW vs NZW : Deepti Sharma ने कसला भारी कॅच घेतला; न्यूझीलंडचा निम्मा संघ ८८ धावांत तंबूत परतला, Video

INDW vs NZW 3rd ODI: भारत-न्यूझीलंड महिला वन-डे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी आला आहे.
deepthi sharma
deepthi sharmaesakal
Updated on

INDW vs NZW 3rd ODI: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड महिला वन-डे मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने, तर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकून दोन्ही संघांनी सामन्यात १-१ ने बरोबरी केली आहे. तिसऱ्या सामन्याचा नाणेफेक न्यूझीलंडने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला पहिल्या २५ षटकांत ५ विकेट्स गमावत ८९ धावा करता आल्या. ज्यामध्ये ३९ धावांवर खेळत असणाऱ्या जॉर्जिया प्लिमरला दिप्ती शर्माने अप्रतीम झेल घेत बाद केले.

एका बाजूने न्यूझीलंडची खेळी घसरत असताना दुसऱ्या बाजूने सलामीवीर जॉर्जिया प्लिमर संघाला सावरण्याचा प्रयत्न करत होती. परंतु आपला पदार्पण सामना खेळणारी फिरकीपटू प्रिया मिश्राने फेकलेला चेंडू प्लिमरला खेळायला जमला नाही आणि चेंडू थेट स्लिपला उभ्या असणाऱ्या दिप्ती शर्माच्या दिशेने गेला. चेंडू दिप्तीपासून दुर होता, पण तीने तत्परता दाखवली आणि डाईव्ह मारत सुंदर झेल केला. जॉर्जिया प्लिमर ६ चौकारांच्या मदतीने ३९ धावा करून माघारी परतली. दिप्तीचा हा झेल बीसीसीआयकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

प्रिया मिश्राने प्लिमरला बाद करून भारताला चौथा विकेट मिळवून दिला आणि प्रियाला पदार्पण सामन्यात दुसरा आंतरराष्ट्रीय विकेट मिळाला. याआधी ११ व्या षटकात कर्णधार सोफी डिव्हाईनला बाद करून प्रियाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय विकेट घेतला व भारताला सामन्यातील तिसरा विकेट मिळवून दिला.

deepthi sharma
20 Balls 94 runs ! Rajat Patidar ने वेगवान शतक झळकावले, IPL 2025 Auction पूर्वी RCB चे टेंशन वाढवले

दोन्ही संघ मालिकेत १-१ अशा बरोबरीत असून आजचा सामना निर्णायक सामना ठरणार आहे. आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला मालिका जिंकता येईल. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. अवघ्या ८८ धावांवर न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी परतला. हाती आलेल्या शेवटच्या वृत्तानुसार ३२ षटकांअंती न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ११८ अशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.