ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना, पण हरमनप्रीत कौरची टीम आज हरली तर काय होणार? जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार

India vs Pakistan Women’s T20 World Cup : न्यूझीलंडकडून पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागणारा भारतीय संघ आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. पण, आजही पदरी निराशा आली तर...
IND vs PAK W T20WC
IND vs PAK W T20WCesakal
Updated on

India vs Pakistan Women’s T20I World Cup 2024 : महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामी लढतीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय महिलांना आज पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संघाला आपला खेळ उंचावून विजय मिळवावा लागेल. पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाचे उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला. पाकविरुद्ध खेळताना यात सुधारणा करण्याची गरज आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता भारतीय संघाला उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळविणे आवश्यक झाले आहे. यानंतर भारताला श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे. सध्या भारताचा नेट रन रेट २.९९ अशी असून ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे.

IND vs PAK W T20WC
Team India semi-Final scenario: भारतीय संघ पहिलाच सामना हरला, उपांत्य फेरीचा मार्ग अवघड झाला; पाकिस्तानचा संघ पुढे गेला...

सलामी सामन्यातील अपयश विसरून हरमनप्रीतच्या भारतीय संघाला नव्या जोमाने मैदानात उत्तरावे लागेल. ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानविरुद्ध नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. आतापर्यंतच्या १५ पैकी १२ सामन्यात भारतीय महिला संघाने विजय मिळवला आहे. तरीही पाकिस्तान संघाला कमी लेखता येणार नाही. कारण अनुभवी निदा डार, कर्णधार फातिमा साना, सादिया इक्बाल या गोलंदाजांपासून भारतीय फलंदाजांना सावध राहावे लागेल. दरम्यान, वेगवान गोलंदाज डायना बेग हिच्या दुखापतीची पाक संघाला चिंता आहे. ती श्रीलंकेविरुद्ध केवळ एकच चेंडू टाकू शकली होती.

पाकिस्तानने आपल्या सलामी सामन्यात श्रीलंकेचा धक्कादायक पराभव केल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारताला अंतिम अकरा खेळाडूंची योग्य निवड करावी लागेल. आजच्या सामन्यात डावखुरी गोलंदाज राधा यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. तिने गेल्या १३ टी-२० सामन्यात २२ विकेट घेतल्या आहेत, त्याचप्रमाणे फलंदाजीला बळकटी देण्यासाठी दयालन हेमलतालाही संधी दिली जाऊ शकते.  

  • सामन्याची वेळ : दुपारी ३.३०

  • थेट प्रक्षेपण : Star Sports network , Disney+ Hotstar app

आज टीम इंडिया हरल्यावर काय होणार?

आज हरमनप्रीत कौरच्या संघाची हार झाल्यास आपले आव्हान जवळपास साखळी गटातच संपुष्टात येईल. पण, तरीही अन्य संघांच्या कामगिरीवर शेवटची आशा असेल. त्यासाठी त्यांना उर्वरित दोन लढती मोठ्या फरकाने जिंकाव्या लागतील. पण, त्यानंतरही पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यावरच आपली वाटचाल अवलंबून असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.