IPL 2025 Auction : ५ वर्षांनी ऑक्शन, ४ ते ६ खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा अन्...! BCCI समोर IPL फ्रँचायझींच्या मागण्या

IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार आहे. हे मेगा ऑक्शन कसं होणार आणि काय नियम असणार हे निश्चित झालेलं नाही. त्यामुळे याबाबत लवकरच आयपीएल फ्रँचायझी आणि बीसीसीआय यांच्यात चर्चा होईल.
IPL Teams
IPL TeamsSakal
Updated on

IPL 2025 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आता पुढील वर्षी होणार आहे. परंतु, त्याआधी प्रत्येक संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कारण आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे.

मात्र, अद्यापही हे मेगा ऑक्शन कसं होणार आणि काय नियम असणार हे निश्चित झालेलं नाही. त्यामुळे याबाबत लवकरच आयपीएल फ्रँचायझी आणि बीसीसीआय यांच्यात चर्चा होईल.

दरम्यान, आयपीएल फ्रँचायजींनी दर पाच वर्षांनी मेगा ऑक्शन, ४ किंवा ६ खेळाडूंचे रिटेंशन, राईट टू मॅच पर्याय असे अनेक पर्याय या मेगा ऑक्शनआधी फ्रँचायझींनी बीसीसीआयला सुचवले असल्याचे समजत आहे.

इएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार एका फ्रँचायझीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की दर ५ वर्षांनी मेगा ऑक्शन घेण्याचे काही फायदे आहेत.

ज्यामुळे संघांना युवा खेळाडूंना घडवण्यासाठी वेळ मिळेल, तसेच संघातही सातत्य राहिल. अनेक फ्रँचायझींनी खेळाडू घडवण्यासाठी ऍकेडमीही तयार केल्या आहेत. अशात ५ वर्षांचा वेळ मिळाला, तर खेळाडू घडवण्यासाठी मदत होईल.

IPL Teams
IPL 2025: नेहराची गुजरात टायटन्सशी सुटणार साथ, तर युवराजची होणार एन्ट्री? नवे अपडेट्स आले समोर

गेल्या काही काळात ४-४ वर्षांनी मेगा ऑक्शन झाले होते. २०१४ नंतर २०१८ साली मेगा ऑक्शन झाले होते. त्यानंतर २०२१ मध्ये मेगा ऑक्शन होणार होते, परंतु कोरोनामुळे ते एक वर्षाने पुढे ढकलण्यात आले होते.

काही फ्रँचायझींनी असाही एक पर्याय सुचवला आहे की मेगा ऑक्शन दरम्यानच्या काळात फ्रँचायझींना मानधनाबाबत थेट खेळाडूंशी बोलण्याचा पर्याय असावा. त्यामुळे आधीच्या लिलावात कमी पैसे मिळालेल्या खेळाडूंना आणखी चांगले पैसेही मिळू शकतात. त्याचबरोबर महत्त्वाच्या खेळाडू संघ सोडून जाण्याचा धोका टाळला जाऊ शकतो.

याशिवाय, एका फ्रँचायझीच्या सीईओने असा पर्याय दिला की एक मोठा खेळाडू रिटेन करायचा आणि बाकी सर्वांसाठी आरटीएम ठेवायचे. ज्यामुळे खेळाडूंना अपेक्षित रक्कमही मिळू शकते आणि फ्रँचायझींना त्यांना पुन्हा संघातही घेता येऊ शकते.

IPL Teams
IPL 2025 : प्रिती झिंटाला Punjab Kings साठी हवा भारतीय प्रशिक्षक; राहुल द्रविडसाठी वाढतेय का रस्सीखेच?

दरम्यान आरटीएमचे कॉम्बिनेशनही काय असणार यावरही विचार करावा लागणार आहे. २०१८ हंगामासाठी झालेल्या मेगा ऑक्शनवेळी प्रत्येक संघांना ५ खेळाडू रिटेन करता येणार होते. यातील ३ खेळाडू लिलावापूर्वीच रिटेन करायचे आणि बाकींच्यासाठी आरटीएम कार्ड वापरायचे.

तसेच जर एकही खेळाडू रिटेन केला नाही, तरी संघांना तीनच आरटीएम वापरण्याची संधी होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आरटीएम कार्ड वापरताना लिलावात त्या खेळाडूला लागलेल्या किंमतीवर फ्रँचायझीला त्याला आपल्या संघात परत घ्यावे लागते.

साल २०२२ मध्ये प्रत्येक संघाला ४ खेळाडूंना संघात कायम करण्याची संधी होती. यामध्ये तीन भारतीय आणि एक परदेशी किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू घेता येत होते.

दरम्यान, आता अंतिम निर्णय फ्रँचायझी आणि बीसीसीआयच्या बैठकीनंतर घेतले जातील. त्यामुळे आता काय निर्णय घेतले जाणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.