IPL 2024 Points-Table: RCB ची शेवटच्या स्थानावरून मोठी झेप! गुजरातला हरवत मुंबई-पंजाबलाही टाकलं मागे

RCB vs GT, IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवल्याने आयपीएलच्या पाँइंट्स-टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत.
IPL Points Table
IPL Points TableSakal
Updated on

IPL 2024 Points-Table: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने शनिवारी गुजरात टायटन्सला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 4 विकेट्सने पराभूत केले. हा बेंगळुरूचा या हंगामातील एकूण चौथा विजय ठरला, तर सलग तिसरा विजय ठरला.

या सामन्यात गुजरातला 19.3 षटकात सर्वबाद 147 धावाच करता आल्या. त्यामुळे आता विजयासाठी बेंगळुरूसमोर 148 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य बेंगळुरूने 13.4 षटकात 6 विकेटस गमावत 152 धावा करून पूर्ण केले.

त्यामुळे आता बेंगळुरूने आयपीएल 2024 स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले असून पाँइंट्स-टेबलमध्येही मोठी झेप घेतली आहे. मात्र, गुजरातची घसरण झाली आहे. बेंगळुरू संघ आता शेवटच्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर आला आहे.

IPL Points Table
ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

बेंगळुरूने 11 सामन्यांतील 4 सामन्यांत विजय मिळवल्याने त्यांचे 8 गुण झाले आहेत. त्यामुळे आता 11 सामन्यांत 3 विजय मिळवून 6 गुणांसह मुंबई शेवटच्या म्हणजेच 10 व्या क्रमांकावर घसरले आहेत.

त्याचबरोबर बेंगळुरूने 7 वा क्रमांक मिळवताना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सलाही मागे टाकले आहे. गुजरातनेही बेंगळुरूप्रमाणेच 11 सामन्यांत 4 विजय आणि 7 पराभव स्विकारले आहेत. त्यांचेही 8 गुण आहेत. तसेच पंजाबने 10 सामन्यांत 4 विजय आणि 6 पराभव पाहिले आहेत. त्यामुळे पंजाबचेही 8 गुण आहेत.

मात्र, बेंगळुरूने 52 व्या सामन्यात तब्बल 38 चेंडू राखून विजय मिळवल्याने त्यांना नेट रन रेटचाही फायदा झाला आहे. त्यांचा नेट रन रेट पंजाब आणि गुजरातपेक्षा चांगला असल्याने ते सातव्या क्रमांकावर आले, तर कमी नेट रन रेटमुळे 8 गुण असूनही पंजाब आठव्या आणि गुजरात नवव्या क्रमांकवर घसरले आहेत.

IPL Points Table
Virat Kohli: 'आमचा सामना तर एका बॉलमध्येच संपू शकतो...' विराट असं का म्हणाला? पाहा Video

दरम्यान, अद्यापही अव्वल क्रमांकावर 16 गुणांसह राजस्थान रॉयल्स आहेत. त्यांनी 10 सामन्यांत 8 विजय आणि 2 पराभव स्विकारले आहेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 10 सामन्यांतील 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले आहेत.

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद आहेत. लखनौ आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी 19 सामन्यांत 6 विजय मिळवून 12 गुण मिळवले आहेत. मात्र नेट रन रेटच्या फरकामुळे लखनौ तिसऱ्या आणि सनरायझर्स चौथ्या क्रमांकावर आहेत.

पाचव्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स संघ आहे. त्यांनी 10 सामन्यांत 5 विजय आणि 5 पराभव स्विकारले आहेत. त्यांचे 10 गुण आहेत. सहाव्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आहे. दिल्लीने 11 सामन्यांतील 5 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 6 सामन्यांत पराभव स्विकारला आहे.

दरम्यान आता प्लेऑफची शर्यत रोमांचक झाली आहे. त्यामुळे आता पहिल्या 4 क्रमांक मिळत कोण प्लेऑफमध्ये जाणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.