IPL 2025 all franchises list of Likely Player Retention - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी २४-२५ नोव्हेंबरला मेगा ऑक्शन होणार आहे. त्याआधी प्रत्येक फ्रँचायझीला सध्याच्या संघातील किमान ६ खेळाडूंना कायम राखण्याची परवानगी BCCI ने दिली आहे. आता हे ६ खेळाडू कोण, याची उत्सुकता उद्या संपुष्टात येईल. कारण, त्यासाठी फ्रँचायझीला ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत ठरवली गेली आहे. काही प्रमुख फ्रँचायझी कोणत्या सहा खेळाडूंना कायम राखतील याचा अंदाज प्रत्येकाला आहेच. पण, काही आश्चर्यचकीत निर्णयही पाहायला मिळू शकतात. लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर हे आपापल्या संघाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. MS Dhoni व Rohit Sharma यांना अनुक्रमे Chennai Super Kings (CSK) आणि Mumbai Indians (MI) कायम राखतील.