प्रशिक्षक आशिष नेहराच्या १८ व्या मोसमात संघासोबत राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याने २०२२ च्या पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले होते. पण या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. आशिष नेहरा सलग चौथ्या सत्रात संघाशी जोडला जाणार आहे. नेहरा प्रशिक्षक म्हणून, गुजरात टायटन्सने पहिल्या सत्रात आश्चर्यकारकपणे विजेतेपद जिंकले आणि दुसऱ्या सत्रात अंतिम फेरी गाठली. जिथे त्यांना सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
हार्दिक पांड्याने आयपीएल २०२४ मध्ये संघ सोडल्यानंतर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली तो चांगली कामगिरी करू शकला नाही आणि आठव्या क्रमांकावर होता. अशा स्थितीत आशिष नेहराच्या गुजरातच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळावर संकटाचे ढग दाटून आले होते. पण गुजरातच्या संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा नेहरावर विश्वास व्यक्त केला आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, नेहरा नवीन हंगामासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक राहील.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी संघासोबत राहतील. याचा अर्थ पुढील हंगामासाठी संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नाही. आशिष कपूर, मिथुन मनहास, नरेंद्र नेगी आणि नईम अमीन संघासोबत राहतील. पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचे प्रशिक्षक बनलेल्या गॅरी कर्स्टनची जागा कोण घेणार याबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. संघाला गॅरी कर्स्टनच्या जागी शोधण्याची गरज आहे. ज्यांनी अलीकडेच २०२४ च्या हंगामानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका सोडली आहे.
दरम्यान यापूर्वी असे वृत्त होते की, हे दोन्ही खेळाडू पुढील हंगामात संघ सोडू शकतात. कारण संघाची मालकी अहमदाबादस्थित कंपनी टोरेंट फार्माकडे आली होती. मात्र आता ही कंपनी या दोन खेळाडूंना आपल्यासोबत ठेवू इच्छित असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.