IPL 205 Chennai Super kings MS Dhoni: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तयारीला आतापासून वेग पकडल्याचे चित्र दिसत आहे. फ्रँचायझीच्या विरोधानंतर मेगा ऑक्शन होण्याची शक्यता कमीच आहे आणि BCCI नेही ६ खेळाडूंना रिटेन करण्याची मागणी जवळपास मान्य केल्यात जमा आहे. पण, महेंद्रसिंग धोनी खेळू शकरणार की नाही याचे चेन्नई सुपर किंग्सला टेंशन होते. BCCI ने हे टेंशन कमी करण्याचे संकेत देताना जुना नियम आणण्याची तयारी सुरू केली आहे.
मागील ३-४ पर्वापासून महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्तीचा चेंडू टोलवत आला आहे. प्रत्येकवेळी त्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. IPL 2024 मध्ये मात्र ही धोनीची शेवटची आयपीएल असे सर्वांनी पक्के केले. गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर माही तेवढा सक्रीय दिसला नाही. तो २-४ चेंडू खेळण्यासाठीच मैदानावर आलेला दिसला. चेपॉक स्टेडियमवर शेवटची मॅच खेळून आयपीएलचा निरोप घ्यायचा हे त्याने आधीच सांगितले होते. तोही सामना या वर्षी झाला, परंतु अजूनही धोनीने स्पष्ट काही सांगितलेलं नाही.
CSK ही धोनीला पुन्हा पुन्हा खेळवण्यास उत्सुक आहे आणि त्यासाठीच त्यांनी BCCI सोबतच्या बैठकीत जुना नियम आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ज्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्ष झाली आहेत, त्याचा आयपीएल २०२५ मध्ये अनकॅप्ड म्हणून समावेश करण्यात यावा, असा हा प्रस्ताव आहे. पण, याला अन्य फ्रँचायझी फार सकारात्मक नाहीत. SRH ची मालक काव्या मारन हिने या नियमामुळे स्टार खेळाडूच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, असे मत व्यक्त केले होते.
''हा नियम पुन्हा येईल याची शक्यता बळावली आहे. मागील महिन्यात झालेल्या बैठकीत यावर बरीच चर्चा झाली आणि लवकरच याची घोषणा केली जाईल,'' असे सूत्रांनी न्यूज१८ ला सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष झाले असल्यास त्या खेळाडूचा अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये समावेश करता यावा, असा हा नियम होता. २००८ पासून लागू करण्यात आलेला हा नियम २०२१ पर्यंत अस्तित्वात होता, परंतु तो रद्द केला गेला.
जुन्या पॉलिसीनुसार अनकॅप्ड खेळाडूला ४ कोटींच्या रकमेपर्यंत रिटेन केले जाऊ शकते. ही रक्कम धोनीच्या प्रतिष्ठेला साजेशी नाही, परंतु या नियम आल्यास CSK चा बराच आर्थिक भार कमी होईल. त्यामुळे चेन्नईला अन्य खेळाडूसाठी चांगली रक्कम मोजता येईल. २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये CSK ने धोनीला १२ कोटींत कायम राखले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.