IPL 2025 Auction Explainer: नवा सिजन, नवे नियम... खेळाडूंचं रिटेंशन, RTM कार्डचा वापर अन् १२० कोटींची किंमत; समजून घ्या सर्वकाही

IPL 2025 Auction Guide, Everything You Need to Know: बीसीसीआयने आयपीएल लिलावाबाबत अनेक नियम केले आहेत. यामध्ये खेळाडूंचे रिटेंशन हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. नक्की हे रिटेंशन कसं होणार आहे, हे जाणून घ्या.
IPL 2025 Auction
IPL 2025 AuctionSakal
Updated on

IPL 2025 Auction Explainer: इंडियन प्रीमियर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलची शनिवारी (२८ सप्टेंबर) बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच २०२५ ते २०२७ साठी काही नियम जाहीर केले आहेत.

यामध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे आयपीएल २०२५ साठी प्रत्येक फ्रँचायझी ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतात, यात जास्तीत जास्त २ अनकॅप्ड खेळाडूंना कायम राहू शकतात. याशिवाय आणखी एक जुना नियम परत आणला आहे, तो म्हणजे जर भारतीय खेळाडू मागील पाच वर्षाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसेल तर तो कॅप्ड भारतीय खेळाडू अनकॅप्ड होईल.

तसेच यंदा प्रत्येक फ्रँचायझीकडे खर्च करण्यासाठी १२० कोटी रुपये असणार आहेत. त्यांना या १२० कोटी रुपयांमध्येच खेळाडूंचे रिटेंशन आणि लिलाव पार पाडायचा आहे. दरम्यान खेळाडू ६ खेळाडूंना एकतर लिलावापूर्वी कायम करू शकतात किंवा राईट टू मॅच कार्ड (RTM) वापरू शकतात.

IPL 2025 Auction
IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

राईट टू मॅच कार्ड लिलावादरम्यान आपल्याच संघातील खेळाडू पुन्हा खरेदी करण्यासाठी वापरता येणार आहे. पण त्यावेळी त्याला लिलावात लागेल त्या किंमतीत संघात घ्यावे लागणार आहे. तसेच संघात खेळाडू कायम करण्यासाठी किंमतही ठरवण्यात आली आहे.

संघात कायम केल्या जाणाऱ्या पहिल्या तीन कॅप्ड खेळाडूंना कमीत कमी अनुक्रमे १८, १४ आणि ११ कोटी रुपये मोजावे लागणार आहे. तसेच जर फ्रँचायझींनी आणखी दोन कॅप्ड खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना १८ आणि १४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच अनकॅप्ड खेळाडूंसाठी कमीत कमी ४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

रिटेंशन आणि RTM

एकूणच या रिटेंशनची रुपरेखा कशी असणार आहे, याबाबत जाणून घेऊ. जर एखाद्या संघाने ५ कॅप्ड आणि १ अनकॅप्ड खेळाडू संघात कायम केले, तर त्या संघाला या ६ खेळाडूंसाठी एकूण ७९ कोटी रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे त्यांच्याकडे लिलावासाठी ४१ कोटी रुपये शिल्लक असतील. तसेच लिलावासाठी RTM कार्ड वापरू शकत नाही.

दुसरी परिस्थिती अशी असू शकते की एखादा संघ ४ कॅप्ड आणि १ अनकॅप्ड खेळाडूंना कायम करू शकतो. अशात तो संघ या पाच खेळाडूंसाठी ६५ कोटी खर्च करेल, तर त्यांच्याकडे लिलावात एक RTM कार्ड असेल आणि ५५ कोटी रुपये लिलावासाठी शिल्लक असतील.

IPL 2025 Auction
IPL Auction 2025: CSK च्या ताफ्यात अश्विन आण्णाची होणार घरवापसी, तर 'लाला'चीही लागणार वर्णी?

दरम्यान, हे देखील लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जर एखाद्या फ्रँचायझीला संघात कायम करणाऱ्या खेळाडूला जादाचे पैसे द्यायचे असतील, तरी ते देऊ शकतात. पण ते पैसे त्यांच्या पर्समधून वजा होतील.

म्हणजे जर एखाद्या कायम केलेल्या खेळाडूला त्याची फ्रँचायझी १८ ऐवजी २० कोटी रुपये देखील देऊ शकतात. पण हे २० कोटी त्यांच्या पर्समधूनच वजा होणार आहेत. तसेच जरी एखाद्या संघाने जर ३ खेळाडू लिलावापूर्वीच कायम केले, तर ते ३ RTM कार्ड लिलावात वापरू शकतात.

परदेशी खेळाडूंसाठी कडक नियम

याशिवाय परदेशी खेळाडूला मेगा ऑक्शनसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षी होणाऱ्या लिलावासाठी अपात्र ठरेल. त्याचबरोबर आयपीएल २०२६ पासूनच्या मिनी ऑक्शनसाठी परदेशी खेळाडूंनाही सॅलरी कॅप असणार आहे.

म्हणजे जर मेगा ऑक्शन दरम्यान जर एखाद्या खेळाडूला सर्वाधिक १७ कोटी रुपयांची बोली लागली आणि लिलावापूर्वी खेळाडूला कायम करताना सर्वाधिक १८ कोटी रुपये मिळाले, तर त्यापेक्षा अधिक पैसे मिनी लिलावात परदेशी खेळाडूवर बोली म्हणून लागू शकणार नाहीत.

आयपीएल फ्रँचायझींना ३१ ऑक्टोबरपर्यंत संघात कायम करणाऱ्या खेळाडूंची यादीत जाहीर करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.