IPL 2025 Retention: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. येत्या काही दिवसात हा लिलाव होईल, त्यामुळे प्रत्येक फ्रँचायझी तयारीला लागला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत संघांना आपल्या संघात कायम केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे.
त्यामुळे कोणते फ्रँचायझी कोणाला संघात कायम करणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे लखनौ सुपर जायंट्स कर्णधार केएल राहुलला संघात कायम करणार की नाही. याबाबतच आता एक नवी माहिती समोर आली आहे.
लखनौ सुपर जायंट्सने केएल राहुलच्या नेतृत्वात २०२२ आणि २०२३ हंगामात प्लेऑफमध्ये धडक मारली होती. मात्र २०२४ मध्ये लखनौ संघ सातव्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतरच केएल राहुलच्या संघातील कायम राहण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.