IPL 2025 : शाहरुख खान अन् प्रीति झिंटाच्या संघाचा सहमालक यांच्यात खडाजंगी, BCCI सोबतच्या बैठकीत असं काय घडलं?

BCCI Meeting : इंडियन प्रीमिअर लीग २०२५च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडत आहे.
shahrukh Khan vs nes wadia
shahrukh Khan vs nes wadia sakal
Updated on

IPL 2025 Auction BCCI Meeting : इंडियन प्रीमिअर लीग २०२५च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडत आहे. आयपीएलमधील १० फ्रँचायझीचे मालक अन् बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये ही बैठक सुरू आहे. पण, या बैठकीत कोलकाता नाइट रायडर्सचा सह मालक व बॉलिवूड सुपर स्टार शाहरुख खान ( Shah Rukh Khan) आणि पंजाब किंग्सचा सह मालक नेस वाडिया यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याचे वृत्त Cricbuzz ने दिलं आहे.

बुधवारी पार पडत असलेल्या बैठकीत प्रत्येक फ्रँचायझीना किमान ५ ते ६ खेळाडूंना रिटेन करण्याची संधी देण्याचा मुद्दा चर्चेत आला. या रिटेन खेळाडूंमध्ये फ्रँचायझींसाठी अनकॅप्ड् खेळाडूला संघात कायम राखता येऊ शकते का, इम्पॅक्ट प्लेअर नियम कायम राहू शकतो का, प्रत्येक संघाला RTM अर्थात राईट टू मॅच नियमानुसार एका खेळाडूला घेता येईल का आणि फ्रँचायझींच्या सॅलरी पर्सची रक्कम वाढवण्यावर चर्चा अपेक्षित होती.

यापैकी रिटेशनच्या संख्येत वाढ या मुद्यावरून शाहरूख व नेस वाडिया यांच्यात वाद झाल्याचे वृत्त समोर येत आहे. शाहरूखसह अनेक फ्रँचायझी रिटेन संख्या जास्त असावी असा आग्रह आहे, परंतु नेस वाडिया यांचा त्याला विरोध आहे. यावरून हा वाद झाला.

दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार गांधी, लखनौ सुपर जायंट्सचे संजीव गोएंका, चेन्नई सुपर किंग्जचे रुपा गुरुनाथ, सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले हेही या बैठकीला उपस्थित होते. मुंबई इंडियन्सच्या अंबानींसह काही मालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित लावली होती. या बैठकीत फ्रँचायझींनी मेगा ऑक्शनला विरोध दर्शवल्याचेही वृत्त आहे आणि सर्वांना मिनी ऑक्शन हवा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.